Poultry Farming : गीज आणि टर्की पक्षी, आधुनिक पोल्ट्री व्यवसाय ठरतोय भारीच, संपूर्ण माहितीचा Video

Last Updated:

कुक्कुटपालन ही कृषिव्यवसायाची एक अत्यंत महत्त्वाची शाखा ठरत आहे. बऱ्याच ठिकाणी जोडधंदा म्हणून शेतकरी कोंबड्या पाळतात आणि बाजारात अंडी, पिले तसेच मांसासाठी खरेदी-विक्री होते.

+
News18

News18

सांगली: कुक्कुटपालन ही कृषिव्यवसायाची एक अत्यंत महत्त्वाची शाखा ठरत आहे. बऱ्याच ठिकाणी जोडधंदा म्हणून शेतकरी कोंबड्या पाळतात आणि बाजारात अंडी, पिले तसेच मांसासाठी खरेदी-विक्री होते. पूर्वीचे कुक्कुटपालन आता पोल्ट्री फार्मिंग झाले आहे. अशा आधुनिक पोल्ट्री फार्मिंगमध्ये आता अंडी, पिले, कोंबड्यांच्या बरोबरच टर्की, बदके, गीज अशा निरनिराळ्या पक्षांचे पालन करणे कुक्कुटपालनाप्रमाणेच फायदेशीर ठरते आहे. आधुनिक पोल्ट्री व्यवसायात आकर्षण ठरणाऱ्या गीज आणि टर्की पक्षाविषयी अधिक जाणून घेऊ पोल्ट्री व्यावसायिक सुहास निकम यांच्याकडून....
गीज पक्षी
गीज असे शास्त्रीय नाव असलेला शुभ्र पांढरा पक्षी. याचा उपयोग घर तसेच हॉटेलच्या अंगणाची शोभा वाढवण्यासाठी करू शकतो. गीज अत्यंत संवेदनशील असल्याने साप, विंचू अशा धोकादायक किटकांची चाहूल लागताच शिकार करते. हा पक्षी सहा महिन्यातून एकदा अंडी घालतो. अंडी घालण्याची क्षमता आठ ते नऊ असते. इतर पक्षांप्रमाणेच गीज स्वतः अंडी उबवतो. 28 दिवसानंतर पिले जन्मतात.
advertisement
टर्की पक्षी
साधारणपणे पंधरा-वीस किलोपर्यंत टर्की पक्षाचे वजन होते. या पक्ष्याचा जनावरांच्या गोठ्यामध्ये संरक्षक म्हणून चांगला वापर होतो. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण डोळ्यांनी साप, विंचू अशा किटकांची चाहूल घेतो आणि शिकार करतो. शेळीपालनच्या गोठ्यामधील विंचू दंशाचा धोका नाहीसा करण्यासाठी टर्की पक्षाचा विशेष फायदा होतो.
advertisement
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक पोल्ट्री फार्म कार्यरत असून त्यांच्यामार्फत परराज्यात, परदेशात अंडी आणि पक्षांची विक्री केली जाते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Poultry Farming : गीज आणि टर्की पक्षी, आधुनिक पोल्ट्री व्यवसाय ठरतोय भारीच, संपूर्ण माहितीचा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement