गीज पक्षी
गीज असे शास्त्रीय नाव असलेला शुभ्र पांढरा पक्षी. याचा उपयोग घर तसेच हॉटेलच्या अंगणाची शोभा वाढवण्यासाठी करू शकतो. गीज अत्यंत संवेदनशील असल्याने साप, विंचू अशा धोकादायक किटकांची चाहूल लागताच शिकार करते. हा पक्षी सहा महिन्यातून एकदा अंडी घालतो. अंडी घालण्याची क्षमता आठ ते नऊ असते. इतर पक्षांप्रमाणेच गीज स्वतः अंडी उबवतो. 28 दिवसानंतर पिले जन्मतात.
advertisement
टर्की पक्षी
साधारणपणे पंधरा-वीस किलोपर्यंत टर्की पक्षाचे वजन होते. या पक्ष्याचा जनावरांच्या गोठ्यामध्ये संरक्षक म्हणून चांगला वापर होतो. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण डोळ्यांनी साप, विंचू अशा किटकांची चाहूल घेतो आणि शिकार करतो. शेळीपालनच्या गोठ्यामधील विंचू दंशाचा धोका नाहीसा करण्यासाठी टर्की पक्षाचा विशेष फायदा होतो.
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक पोल्ट्री फार्म कार्यरत असून त्यांच्यामार्फत परराज्यात, परदेशात अंडी आणि पक्षांची विक्री केली जाते.





