TRENDING:

ESIC रुग्णालयांसाठी सरकारी देणार मोफत जमीन, महायुती सरकाराचा मोठा निर्णय

Last Updated:

ईएसआयसी रुग्णालयांसाठी मागणी केलेल्या जमिनीचे बाजारमूल्य १ कोटी रुपयांपर्यंत असल्यास विभागाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: कामगारांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्याईएसआयसी रुग्णालयांबद्दल महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ईएसआयसी रुग्णालय उभारण्यासाठी सरकारी जमिनी ही 'विनामूल्य' देणार असल्याची माहिती  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.  सरकारी जमीन 'महसूल मुक्त' आणि 'सारा माफी'ने मोफत दिली जाणार आहे. राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
News18
News18
advertisement

राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त' आणि 'सारा माफी'ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होईल आणि सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील १५ एकर गायरान जमीन २०० खाटांच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जून २०२५ मध्ये घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्यात जिथे जिथे ईएसआयसी रुग्णालये प्रस्तावित आहेत, तिथे हाच नियम लागू करून सरकारी जमीन उपलब्ध असल्यास विनामूल्य दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

advertisement

निर्णयाचे स्वरूप आणि जमिनीचे निकष

- ईएसआयसी रुग्णालयांसाठी मागणी केलेल्या जमिनीचे बाजारमूल्य १ कोटी रुपयांपर्यंत असल्यास विभागाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.

- जमिनीचे मूल्य १ कोटींपेक्षा जास्त असल्यास वित्त विभागाच्या सहमतीने जमीन मोफत दिली जाईल. या जमिनीचा ताबा हा 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून राहील.

- रुग्णालयाच्या खाटांच्या क्षमतेनुसार जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. एफ.एस.आय १.५ किंवा २.० च्या उपलब्धतेनुसार हे प्रमाण असेल.

advertisement

- ५०० खाटांचे रुग्णालयांसाठी ८ ते १२ एकर जमीन, तर ३०० खाटांच्या रुग्णालयांसाठी ६ ते ९ एकर जमीन मिळेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

- २०० खाटांचे रुग्णालयसाठी ५ ते ७ एकर जमीन, तर १०० खाटांचे रुग्णालयास ३ ते ५ एकर जमीन देण्यात येईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ESIC रुग्णालयांसाठी सरकारी देणार मोफत जमीन, महायुती सरकाराचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल