राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यातही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?
१. राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
advertisement
२. प्रकाश खपले (IAS:SCS:२०१३) आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
३. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:२०१६) व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे आयुक्त म्हणून नियुक्ती
४. त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:२०१६) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची एससी आणि एचएससी बोर्ड पुणे येथे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
५. अंजली रमेश (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती
