अर्णविला लहानपणापासूनच ट्रेकिंग करण्याची खूप आवड आहे. ती नेहमी तिच्या वडिलांसोबत शहरातील गोगाबाबा टेकडी आणि साई टेकडी या ठिकाणी जात असते. अर्णवी जेव्हा अडीच वर्षांची होती, तेव्हा तिने सगळ्यात पहिले शहरातील गोगाबाबा टेकडी सर केली होती आणि तेव्हा तिच्या आई-वडिलांच्या असे लक्षात आले की, ही तिची आवड आहे.
नंतर अनेक वेळा ती वडिलांसोबत गोगाबाबा टेकडी आणि साई टेकडी या ठिकाणी गेलेली आहे. अर्णवीचे वडील हे वजीर शिखर सर करण्यासाठी जाणार होते, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला हा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर विचारले की, तुला या ठिकाणी यायचं आहे का? तेव्हा तिने लगेच होकार दिला आणि त्यानंतर एका रात्रीतून सर्व तयारी करून अर्णवी देखील वजीर शिखराकडे जाण्यासाठी निघाली आणि तिने त्या ठिकाणी जाऊन हे शिखर पार केले आहे.
advertisement
Sangli News: अबब! चक्क 300 अंडी देणारी कोंबडी, कमी खर्चात देतेय बक्कळ कमाई, शेतकऱ्यांची फेव्हरेट!
अर्णवी सांगते की, मला हे शिखर सर करताना खूप मजा आली आणि या ठिकाणी मी चढत होते, तेव्हा मला बिलकुल भीती नाही वाटली. उलट मी माझ्या पप्पांच्या आधी शिखरावरती जाऊन पोहोचले होते. मी वरती गेल्यानंतर पाऊस सुरू झाला, ढग पडले आणि त्यावेळेस मला खूप छान वाटले. अजिबात भीती मनामध्ये वाटली नाही, असे तिने सांगितले आहे आणि त्यासोबतच अर्णवी म्हणाली की, मी खाली आल्यानंतर पप्पांना विचारले की, यापेक्षा अजून कुठले उंच शिखर आहे? तेव्हा मला पप्पांनी सांगितले की, एव्हरेस्ट आहे आणि पप्पांना मी म्हटले की, मला आता एव्हरेस्ट शिखर चढायचे आहे.
अर्णवी एवढी लहान असून तिने एवढे अवघड शिखर सर केले आहे, त्यामुळे मला तिचा अभिमान आहे आणि भविष्यात तिला एव्हरेस्ट चढायचे आहे, तर त्यासाठी आम्ही तिला संपूर्ण सपोर्ट करू, असे अर्णवीची आई म्हणाली आहे.





