वय अवघे साडेसात वर्षे, अर्णवीने केली कमाल, 2500 फूट उंचीवरील शिखर केले सर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
अर्णवीने ही कठीण मोहीम अनुभवी ट्रेकर, हायकर आणि पर्वतारोहक असलेले तिचे वडील अनिकेत चव्हाण यांच्यासोबत पूर्ण केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सह्याद्री किल्ल्याच्या माहुली पठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे 2,500 फूट उंचीवरील अन् 280 फूट उभी (90 अंशाची) चढाई करावी लागणारे वजीर शिखर (वजीर पिनॅकल) शहरातील अर्णवी अनिकेत चव्हाण (7 वर्षे 4 महिने) या चिमुकल्या गिर्यारोहक मुलीने सर केले. अर्णवीने ही कठीण मोहीम अनुभवी ट्रेकर, हायकर आणि पर्वतारोहक असलेले तिचे वडील अनिकेत चव्हाण यांच्यासोबत पूर्ण केली आहे.
अर्णविला लहानपणापासूनच ट्रेकिंग करण्याची खूप आवड आहे. ती नेहमी तिच्या वडिलांसोबत शहरातील गोगाबाबा टेकडी आणि साई टेकडी या ठिकाणी जात असते. अर्णवी जेव्हा अडीच वर्षांची होती, तेव्हा तिने सगळ्यात पहिले शहरातील गोगाबाबा टेकडी सर केली होती आणि तेव्हा तिच्या आई-वडिलांच्या असे लक्षात आले की, ही तिची आवड आहे.
नंतर अनेक वेळा ती वडिलांसोबत गोगाबाबा टेकडी आणि साई टेकडी या ठिकाणी गेलेली आहे. अर्णवीचे वडील हे वजीर शिखर सर करण्यासाठी जाणार होते, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला हा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर विचारले की, तुला या ठिकाणी यायचं आहे का? तेव्हा तिने लगेच होकार दिला आणि त्यानंतर एका रात्रीतून सर्व तयारी करून अर्णवी देखील वजीर शिखराकडे जाण्यासाठी निघाली आणि तिने त्या ठिकाणी जाऊन हे शिखर पार केले आहे.
advertisement
अर्णवी सांगते की, मला हे शिखर सर करताना खूप मजा आली आणि या ठिकाणी मी चढत होते, तेव्हा मला बिलकुल भीती नाही वाटली. उलट मी माझ्या पप्पांच्या आधी शिखरावरती जाऊन पोहोचले होते. मी वरती गेल्यानंतर पाऊस सुरू झाला, ढग पडले आणि त्यावेळेस मला खूप छान वाटले. अजिबात भीती मनामध्ये वाटली नाही, असे तिने सांगितले आहे आणि त्यासोबतच अर्णवी म्हणाली की, मी खाली आल्यानंतर पप्पांना विचारले की, यापेक्षा अजून कुठले उंच शिखर आहे? तेव्हा मला पप्पांनी सांगितले की, एव्हरेस्ट आहे आणि पप्पांना मी म्हटले की, मला आता एव्हरेस्ट शिखर चढायचे आहे.
advertisement
अर्णवी एवढी लहान असून तिने एवढे अवघड शिखर सर केले आहे, त्यामुळे मला तिचा अभिमान आहे आणि भविष्यात तिला एव्हरेस्ट चढायचे आहे, तर त्यासाठी आम्ही तिला संपूर्ण सपोर्ट करू, असे अर्णवीची आई म्हणाली आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 18, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
वय अवघे साडेसात वर्षे, अर्णवीने केली कमाल, 2500 फूट उंचीवरील शिखर केले सर, Video

