राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यातही सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
१. संजय खंदारे (IAS:RR:१९९६) प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आले आहे.
advertisement
२. परराग जैन नैनुतिया (IAS:RR:१९९६) प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३. कुणाल कुमार (IAS:RR:१९९९) यांना शिवशाही पुनर्वासन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४. वीरेंद्र सिंह (IAS:RR:२००६) सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
५. ई. रावेंदीरन (IAS:RR:2008) मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांची नियुक्ती सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
६. एम.जे. प्रदीप चंद्रन (IAS:RR:2012) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
७. पवनीत कौर (IAS:RR:2014) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
