Success Story : दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, जनार्धन यांनी अंधत्वावर मात करत डिफेन्स विभागात मिळवली नोकरी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
तुमच्या मनात एखादी गोष्ट मिळवण्याची धडपड आणि जिद्द असेल, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता, अगदी समोर अडचणींचा डोंगर असला तरीही. जनार्धन कोळसे यांनी आणि हेच सिद्ध करून दाखवलं आहे.
पुणे : तुमच्या मनात एखादी गोष्ट मिळवण्याची धडपड आणि जिद्द असेल, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता, अगदी समोर अडचणींचा डोंगर असला तरीही. जनार्धन कोळसे यांनी आणि हेच सिद्ध करून दाखवलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जन्मलेले जनार्धन कोळसे हे जन्मतःच दृष्टिहीन आहेत पण अंधत्वावर मात करत त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. रेल्वेमध्ये छोट्या-मोठ्या वस्तू विकण्यापासून ते आज डिफेन्स विभागात चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
जनार्धन कोळसे यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे कॉलेजमधून पूर्ण केलं. 2006 साली पदवी मिळाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले, तिथे त्यांनी कॉम्प्युटर आणि सॉफ्ट स्किल्सचे कोर्सेस पूर्ण केले आणि एका प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पण अंध असल्यामुळे त्याठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या दरम्यान त्यांनी काही काळ पेट्रोल पंपावरही काम केलं.
advertisement
मुंबई आणि पुण्यात राहत असताना जनार्धन कोळसे यांना खूप संघर्ष करावा लागला. राहण्यापासून ते दोन वेळच्या जेवणापर्यंत पण संघर्षाच्या काळातही त्यांचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही. याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास सुरू केला. मात्र दृष्टिहीन उमेदवारांसाठी रायटर वेळेवर न मिळणं किंवा अपुरी तयारी असलेला रायटर मिळणं, या अडचणी वारंवार समोर येत होत्या. अनेक अडचणी असूनदेखील जनार्धन यांनी जवळपास पाच वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
advertisement
अखेर 2011 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संरक्षण विभाग या दोन्ही ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू होती. जनार्धन कोळसे यांनी दोन्ही परीक्षा दिल्या आणि दोन्ही ठिकाणी त्यांची निवडही झाली. मात्र त्यांनी संरक्षण विभागातील क्लर्क पदाची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला पण ते दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे दृष्टिहीन असल्याने, डिफेन्स सेवेसाठी पात्र नाही, असं सांगत त्यांना नोकरी नाकारण्यात आली.
advertisement
दरम्यान, त्यांचा प्रायव्हेट जॉबही गेला. तरीही जनार्धन यांनी हार मानली नाही. रेल्वेमध्ये छोट्या-मोठ्या वस्तू विकून त्यांनी संसाराचा गाडा चालवला आणि आपल्या डिफेन्स विभागातील नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिले. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्यांना डिफेन्स विभागात नोकरी मिळाली. आज जनार्धन कोळसे हे अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 28, 2025 7:37 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, जनार्धन यांनी अंधत्वावर मात करत डिफेन्स विभागात मिळवली नोकरी, Video

