जितेंद्र आव्हाड यांचा सर्वात खास आणि विश्वासू मानला जाणाऱ्या नेत्याने आधी बंडखोरी करुन पक्षाची साथ सोडली. आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणुकीत टफ फाईट देण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे.
कधी एकेकाळी जितेंद्र आव्हाड आणि नजीब एकदम विश्वासू मानले जात होते. मात्र नजीब यांनी अजित पवारांना साथ देण्याता निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीची साथ सोडली. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून त्यांना कळवा मुंब्रा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात टफ फाईट पाहायला मिळणार आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर केलेली पहिली यादी जाहीर झाली असून 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिल्याने महायुतीचं पारडं जड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवार जाहिर न झालेले मतदारसंघ
आजच्या यादीत वडगाव शेरी, शिरूर, फलटण आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. त्याशिवाय, राष्ट्रवादीचे मुंबईतील संभाव्य उमेदवार झिशान सिद्दिकी यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचे नाव जाहीर न झाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.
