TRENDING:

20 आमदारांचा पक्ष अन् नगरपरिषदेत घसरले, ठाकरे गट नेमका जिंकला कुठे? संपूर्ण यादी

Last Updated:

महापालिकेच्या पेपरची तयारी करणारी ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेच्या निवडणुकीत सपशेल नापास झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  नगरपालिका निवडणुकीत मविआची धुळधाण उडाली. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत एक प्रकारे बाय दिला होता.  नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. भावकी आणि गावकीतली निवडणूक असल्याचं कारण देत ठाकरेंच्या शिवसेनेनं ही निवडणूक फारशी गांभीर्यानंच घेतली नव्हती.  ठाकरेंचे नेते प्रचारातून देखील गायब होते. परिणामी महापालिकेच्या तयारीसाठी नगरपालिकेकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
News18
News18
advertisement

निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिसले नाही. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली नाही. आदित्य ठाकरेही प्रचारात दिसले नाही. ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत दारुण प्रभाव झाला असून विधानसभेत आमदारसंख्या 20 असलेल्या ठाकरे गटाला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रतिमेवर झालेला परिणाम

advertisement

उद्धव ठाकरे हे सेनापती मैदानात नसल्यामुळे त्यांचं सैन्य स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात लढलं. मात्र हे पुरेसं नव्हतं. एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेचं कचखाऊ धोरण, नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रतिमेवर झालेला परिणाम आणि मतदारांना आश्वासक न वाटलेला पक्ष याचा परिणाम धुळधाण उडण्यात झाला.   नेते पराभूत मानसिकतेतून बाहेर पडत नाहीत, हेच त्यांच्या पराभवाचं कारण असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला.  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचारात उतरले नाहीत, यामुळे मतदारांना ठाकरे गटाविषयी विश्वासच वाटला नाही, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं.

advertisement

ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी (Uddhav Thackeray Shivsena Winner List) 

जिल्हा नगरपरिषद / नगरपंचायतीचे नाव विजयी उमेदवारांचे नाव पक्ष
रायगड श्रीवर्धन अतुल चोगले उबाठा
जळगाव धरणगांव लीलाबाई चौधरी उबाठा
जळगाव यावल छाया पाटील उबाठा
सोलापूर कुरडूवाडी जयश्री भिसे उबाठा
छ. संभाजीनगर फुलंब्री राजेंद्र ठोंबरे उबाठा
नांदेड किनवट सुजाता एड्रलवार उबाठा
अमरावती नंद-खांदेश्वर प्राप्ती मारोडकर उबाठा
बुलढाणा मेहकर किशोर गारोडे उबाठा
यवतमाळ ढाणकी अर्चना वासमवार उबाठा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

उद्धव ठाकरेंनी काही सभा घेतल्या असत्या, आदित्य ठाकरेंसारख्या युवा नेत्यांनी रोड शो केले असते तरी मतदारांवर काही प्रमाणात प्रभाव पडला असता. मात्र महापालिकेच्या पेपरची तयारी करणारी ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेच्या निवडणुकीत सपशेल नापास झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
20 आमदारांचा पक्ष अन् नगरपरिषदेत घसरले, ठाकरे गट नेमका जिंकला कुठे? संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल