छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहेत. आता 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोलमधून कुणाचं सरकार येणार, कोण जिंकणार याचे अंदाज वर्तवले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळी अटीतटीची लढत होत आहे. पूर्व मतदार संघामध्ये भाजपचे उमेदवार अतुल सावे, एमआयएमकडून इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीकडून लहुजी शेवाळे हे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या तिरंगी लढतीत कोण आमदार होणार याबद्दल संभाजीनगरकरांनी आपल्या अंदाज लोकल18 शी बोलताना वर्तवला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदारसंघामधील काही नागरिकांना असं वाटत आहे की, अतुल सावे हे निवडून येतील. याबद्दल बऱ्याच लोकांनी हाच कौल दिला असून अतुल सावे हेच हॅट्रिक साधतील. 2014 पासून अतुल सावे या मतदारसंघांमध्ये आमदार राहिलेले आहेत आणि मंत्री देखील होते. अतुल सावे यांनी भरपूर कामं मतदारसंघामध्ये केलेली आहे. त्यामुळे अतुल सावे निवडून येतील असं मत या मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
तर, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभेत आपलं नशीब आजमावत आहे. त्यामुळे अतुल सावे यांना जलील यांचं कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहण्याचं ठरणार आहे.