मुंबई: राज्यात सोमवारपासून घटस्थापना होणार असून नवरात्रोत्सवाचाही उत्साह दिसणार आहे. या नवरात्रौत्सवाच्या उत्साहावर पाऊस पाणी फेरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावणारा पाऊस या आठवड्यातही बरसण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यात नवरात्रोत्सवात धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व व उत्तर पूर्व भागापासून ते म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टीपर्य कमी दाबाचा पट्टा 25 सप्टेंबर रोजी तयार होणार आहे. त्यामुळेच पावसाचा जोर कायम आणि मुसळधार राहणार आहे. या बदलामुळेच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हा जोर 26 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. तळकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिकचा पाऊस राहणार आहे.
शनिवारी (ता. 20) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. खोपोली (घाटमाथा), पंढरपूर आणि जालना येथे तब्बल 80 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
> कोणत्या जिल्ह्याला कधी येल्लो अलर्ट?
रायगड (21-22 सप्टेंबर)
रत्नागिरी (21-22 सप्टेंबर)
सिंधुदुर्ग (23 सप्टेंबर),
जळगाव (23 सप्टेंबर),
नाशिक (22 ते 24 सप्टेंबर),
अहिल्यानगर (21ते 24 सप्टेंबर),
पुणे (21 ते 24 सप्टेंबर),
कोल्हापूर घाटमाथा (23, 24 सप्टेंबर)
कोल्हापूर (23, 24 सप्टेंबर)
सातारा (22 ते 24 सप्टेंबर)
सातारा घाटमाथा (23-24 सप्टेंबर)
सांगली (22 ते 24 सप्टेंबर)
सोलापूर (22 ते 24 सप्टेंबर)
संभाजीनगर (21 ते 24 सप्टेंबर)
जालना (22 ते 24 सप्टेंबर)
परभणी (22 सप्टेंबर)
बीड (21 ते 24 सप्टेंबर)
बीड (21 ते 24 सप्टेंबर)
हिंगोली (21 ते 24 सप्टेंबर)
लातूर (21 ते 24 सप्टेंबर)
नांदेड (21 ते 24 सप्टेंबर)
धाराशिव (21 ते 21 सप्टेंबर)