TRENDING:

महायुतीत पाडापाडी होणार? भाजपविरोधात या ठिकाणी भाई-दादांच्या पक्षाकडून बंडखोरी!

Last Updated:

Maharashta Assembly Election : महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी भाजप विरोधात भाई-दादांच्या पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी महायुती, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला. बंडखोरी टाळण्यासाठी जागा जाहीर करताना पक्षांकडून उशीर केला गेला. पण तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर बंडखोरांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. एकूण १५० पेक्षा जास्त उमेदवांनी बंडखोरी केलीय. यात सर्वाधिक फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. महायुतीच्या ८० उमेदवारांविरोधात बंडखोरी झालीय.
News18
News18
advertisement

महायुतीत भाजप सर्वाधिक १५२ जागांवर निवडणूक लढत आहे. महायुतीने २८४ जागांवर २८९ उमेदवार जाहीर केले आहेत. यात पाच मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार आहेत. तर दोन जागांवर एकही उमेदवार दिलेला नाही. महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी भाजप विरोधात भाई-दादांच्या पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केलीय. भाजपविरोधात शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार उभा आहेत.

advertisement

बोरिवलीतून गोपाल शेट्टी यांनी भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी केलीय. तर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे. नवी मुंबईत संजीव नाईक यांनी भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंडखोरी केलीय.

मानखुर्दमध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अर्ज भरला आहे. नवाब मलिक यांनी अखेरच्या क्षणी अर्ज दाखल करत सर्वांना धक्का दिला. नवाब मलिक हे शिवसेनेच्या सुरेश पाटील यांच्याविरोधात लढणार आहेत. मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होता. भाजप नेते आशिष शेलार यांनीही मलिक यांच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा नसल्याचं म्हटलंय. नवाब मलिक यांच्यासाठी भाजप प्रचार करणार नाही असंही स्पष्ट केलंय.

advertisement

मानखुर्द प्रमाणेच महायुतीने आष्टी आण मोर्शीत एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. तर उमरेडमध्ये शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने भाजपविरोधात बंड पुकारलं आहे. तर राजुरा मतदारसंघात बंडखोरी झाली असून दोन माजी आमदारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यामुळे भाजपच्या उमेदवाराची अडचण होणार आहे. या मतदारसंघात भाजपने मुनगंटीवारांचे समर्थक असलेल्या देवराव भोंगळेंना उमेदवारी दिलीय.

ब्रह्मपुरीत भाजपच्या कृष्णा सहारे यांना अपक्ष उमेदवार वसंत वारजूकर यांचं आव्हान आहे. तर अमरावतीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आर्वीत भाजपने विद्यमान आमदार दादा केचे यांचं तिकिट कापले. इथं फडणवीसांचे निकटवर्तीय सुमीत वानखेडेंना तिकीट दिलं असून दादा केचे हे अपक्ष मैदानात उतरले आहेत.

advertisement

महायुतीत कुठे कुठे बंडखोरी?

विक्रमगड, चिंचवड, सांगली, जत, शिराळा, दौंडमध्ये भाजप उमेदवारांविरोधात महायुतीच्याच नेत्यांनी बंडखोरी केलीय. तर सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण या तिन्ही मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांसह भाजपच्याच नाराजांनी पक्षाला आव्हान दिलंय.

भाजपविरोधात भाई-दादांच्या नेत्यांची बंडखोरी

विक्रमगड इथं शिंदेंच्या शिलेदाराने बंड पुकारलंय. तर चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर मैदानात उतरले आहेत. सांगलीत भाजपच्याच शिवाजी डोंगरे यांनी अर्ज दाखल केलाय. जतमध्ये भाजपचेच तम्मनगौडा पाटील आहेत. तर शिराळ्यात सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केलीय. दौंडमध्ये अजित पवार गटाच्या वीरधवल जगदाळे यांनी भाजप उमेदवाराविरोधात दंड थोपटले आहेत. सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपच्या तीन तर शिवसेनेच्या एका उमेदवाराने बंडखोरी केलीय. सोलापूर शहर मध्य मध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी बंड केलं आहे. तर दक्षिणमधून भाजपच्याच दोघांनी अर्ज दाखल केले आहेत.

advertisement

राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेलाही बंडखोरांचे आव्हान

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

शिवसेनेला सावंतवाडी, अलिबाग आणि खानापूर आटपाडी या मतदारसंघांमध्ये भाजपच्या बंडखोरांनी आव्हान दिलं असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पिंपरी, मावळ, भोर, जुन्नर, शिरुर, माढा या मतदारसंघातही बंडखोरी झाली आहे. या जागांवरही महायुतीला बंडखोरांचे आव्हान असणार आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुतीत पाडापाडी होणार? भाजपविरोधात या ठिकाणी भाई-दादांच्या पक्षाकडून बंडखोरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल