शहर वाहतुकीत बदल
दत्त चौक-यशवंत हायस्कूल-आझाद चौक-नेहरू चौक-चावडी चौक-बालाजी मंदिर-झेंडा चौक-कृष्ण घाट या मार्गावरून गणेश विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे. या मार्गावर कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही, तसेच पार्किंग करण्यासही परवानगी नाही. ही वाहतूक कोल्हापूर नाका बाजूकडील वाहतूक दत्त चौक-आझाद चौक-सात शहीद चौक-शुक्रवार पेठ-बालाजी मंदिर या मार्गाद्वारे वळवण्यात येणार आहे.
कृष्ण नाका बाजूकडील वाहतूक कृष्णा नाका-जोतिबा मंदिर-कमानी मारुती मंदिर-सोमवार पेठ-जनल्याण बँक या मार्ग एकेरी पद्धतीने चालवली जाणार आहे. कमानी मारुती मंदिरातून कृष्णा नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना बंदी असेल, तर कृष्णा नाका-जोतिबा मंदिर-कमानी मारुती मंदिर-चावडी चौक-कृष्ण घाट मार्ग संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
कुठे केलीय पार्किंग व्यवस्था
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपाली वाहने निश्चित केलेल्या ठिकाणीच पार्क करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिवाजी उद्यान आणि कन्या शाळेसमोरील मोकळी मैदाने, श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे मैदान, दत्त चौक, जनता पे ॲण्ड पार्क, यशवंत हायस्कूल मागील मैदान या ठिकाणी नागरिकांना आपली वाहने पार्क करता येणार आहेत. आपत्कालीन सेवांना मुभा आहे.
हे ही वाचा : Local Ticket: फुकट्या लोकल प्रवाशांची होणार पंचाईत! क्यूआर कोड तिकीटविक्री बाबत रेल्वेचा मोठा निर्णय
हे ही वाचा : कर्मचाऱ्यांचा मोठा कांड, बँकेला असं गंडवलं की थेट 25500000 लागला चुना, वर्ध्यात 'डोकं हालवणारी' फसवणूक!