Local Ticket: फुकट्या लोकल प्रवाशांची होणार पंचाईत! क्यूआर कोड तिकीटविक्री बाबत रेल्वेचा मोठा निर्णय
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Local Ticket: लोकल प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरील विशिष्ट क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येतं होतं.
मुंबई: मुंबई आणि उपनगरांमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारपासून (4 सप्टेंबर) क्यूआर कोडवरून तिकीटविक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रेल्वे स्टेशन किंवा लोकलमध्ये तिकीट तपासनीस दिसताच सर्रास क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचे प्रकार वाढीस लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता प्रवाशांना रांगेत उभं राहून तिकीट घ्यावं लागणार आहे. क्यूआर कोडची सुविधा बंद करण्यात आली असली तरी यूटीएस अॅपचा पर्याय मात्र सुरू ठेवण्यात आला आहे.
याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट खिडकीवर रांगेत उभं राहून तिकीट काढण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका व्हावी, या हेतूने रेल्वेने 2016मध्ये यूटीएस अॅप सुरू केलं. या अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर आणि प्लॅटफॉर्मवरील विशिष्ट क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येतं होतं. या सुविधेमुळे अनेक प्रवाशांनी समाधान देखील व्यक्त केलं होतं. मात्र, दिवसेंदिवस या सेवेचा गैरवापर वाढू लागला आहे.
advertisement
अनेक जण तिकीट तपासनीस दिसल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढतात. तिकीट तपासनीस नसतील विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता क्यूआर कोड स्कॅनच्या माध्यमातून होणारी तिकीटविक्री बंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात याबाबत मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाला पत्र लिहिलं होतं. त्याला मंजुरी मिळाल्याने गुरुवारपासून ही सेवा बंद करण्यात आली.
advertisement
नवीन पर्यायावर विचार सुरू
view commentsरेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी परिसरात डिजिटल स्क्रीन बसवून बदलणारे (डायनॅमिक) क्यूआर कोड कार्यान्वित करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सर्व रेल्वे स्टेशन्सवर स्क्रीनची सोय करावी लागणार आहे. ही नवीन व्यवस्था सुरू होईपर्यंत क्यूआर कोड स्कॅन करून होणारी तिकीटविक्री बंदच राहील, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Ticket: फुकट्या लोकल प्रवाशांची होणार पंचाईत! क्यूआर कोड तिकीटविक्री बाबत रेल्वेचा मोठा निर्णय


