कर्मचाऱ्यांचा मोठा कांड, बँकेला असं गंडवलं की थेट 25500000 लागला चुना, वर्ध्यात 'डोकं हालवणारी' फसवणूक!

Last Updated:

Vardha News : वर्धा शहरातील भामटीपुरा येथील Axis बँकेत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्याच...

Vardha News
Vardha News
Vardha News : वर्धा शहरातील भामटीपुरा येथील Axis बँकेत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्याच 5 कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 2 कोटी 55 लाख 92 हजार रुपयांचे कर्ज लाटले आहे. बँक व्यवस्थापक अमित मिश्रा यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
नेमके काय घडले?
Axis बँकेने वैयक्तिक कर्ज प्रकरणांसाठी बंगळूरु येथील ‘क्वेस्ट कॉर्प लिमिटेड’ या कंपनीची मदत घेतली होती. आरोपी याच कंपनीचे कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांनी वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील 26 कर्ज प्रकरणे हाताळली. आरोपींनी गरजू आणि गरीब लोकांना कर्जाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्या नावाने बनावट पगार स्लिप, बनावट बँक स्टेटमेंट आणि खोट्या सह्या वापरून कागदपत्रे तयार केली. ही सर्व कागदपत्रे नागपूर येथील Axis बँकेच्या कर्ज केंद्रात सादर करून त्यांनी कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम मंजूर झाल्यावर त्यांनी त्यातील काही भाग रोखीत काढून घेतला, तर काही रक्कम बँक व्यवहारांद्वारे स्वतःच्या खात्यात वळवली.
advertisement
फसवणुकीचा पर्दाफाश
जेव्हा बँकेच्या लक्षात आले की काही कर्जप्रकरणांची परतफेड सुरू झालेली नाही, तेव्हा बँकेच्या अंतर्गत दक्षता विभागाने तपास सुरू केला. या तपासणीत सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे आणि कर्ज घेतलेल्या लोकांची परतफेड करण्याची क्षमता नसल्याचे उघड झाले. त्यानंतर बँकेने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी सेलू तालुक्यातील धामणगाव येथील शशिकांत मांडरे, प्रदीप भांडेकर, अंकुश वैरागडे, तसेच गोंदिया येथील प्रदीप रहांगडाले आणि यवतमाळ येथील उमेश राठोड अशा पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कर्मचाऱ्यांचा मोठा कांड, बँकेला असं गंडवलं की थेट 25500000 लागला चुना, वर्ध्यात 'डोकं हालवणारी' फसवणूक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement