राष्ट्रवादीत गटबाजी, भाजपमध्ये मतभेद, इस्लामपूरात फोडाफोडीचं राजकारण पेटणार; खुर्चीसाठी कोणाचा दावा प्रबळ?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News : इस्लामपूरचं राजकारण चांगलंच पेटलं आहे. गणेशोत्सानिमित्ताने शहरात प्रत्येक राजकीय पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा बराच प्रयत्न केला आहे. यात...
Sangali News : इस्लामपूरचं राजकारण चांगलंच पेटलं आहे. गणेशोत्सानिमित्ताने शहरात प्रत्येक राजकीय पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा बराच प्रयत्न केला आहे. यात राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि शिवसेना यांच्या चुरस दिसत आहे. असं असलं तरी शहरात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे दिसते, त्यामुळे आगामी निवडणुकीत खमके नेतृत्व सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. याच राजकीय पार्श्वभूमीवर नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न नक्की केला जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा नगराध्यक्ष होईल का?
यंदाच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील हे 'तुतारी फुंकणारा माणूस' या चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्याकडे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष बी.ए. पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, ॲड. धैर्यशील पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधवस माजी नगरसेवक डाॅ. संग्राम पाटील हे सर्व नेेते प्रभागापुरते आहे. यांच्यातील एखादा नेता नगराध्यक्ष पदासाठी आघाडी घेईल, नाहीतर आरक्षण पडलं की, निर्णय होईल.
advertisement
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची ताकद वाढतीय?
राष्ट्रवादी (अजित पवार) काॅंग्रेस पक्षाची जबाबदारी निशिकांत पाटील यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्याकडे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी बांधकाम सभापती मनीषा पाटील, केदार पाटील, असे ताकदीचे नेते आहेत. भाजपचा विचार करता महाडिक गडाकडून कपिल ओसवाल, सतीष महाडिक सक्रिय असलेले दिसतात. दुसरीकडे भाजपचे नेते विक्रम पाटील यांनीसुद्धा स्वतंत्रपणे नगराध्यक्षपदाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. पण कपिल पाटलांचीही तितकीच तयारी सुरू आहे. अशा माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांचीही नगराध्यक्षपदासाठी दावेदारी दिसत आहे.
advertisement
शहरात शिवसेनेची अवस्था काय?
आत्तापर्यंत इस्लामपूर शहरात शिवसेना नेहमीच स्वबळावर लढल आलेली आहे. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हे नेहमीच स्वबळावर लढतात. त्यांच्याकडे सागर मलगुंडे हे नेतृत्त्व आहे. पण यांच्याशिवाय शिवसेनेकडे म्हणावे असे खमके नेतृत्व नसल्याचे दिसते. त्यामुळे पवार हेच नगराध्यक्षपदाचे दावेदार असू शकतात. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर इस्लामपुरात फोडाफोडीचे राजकारण पेटणार हे स्पष्ट आहे. त्यात कोणाला संधी मिळेल, याची चर्चा चांगलीच रंगलेली दिसते.
advertisement
हे ही वाचा : पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळणार? शिवेंद्रराजेंचं सातारा गॅझेटसंबंधी मोठं वक्तव्य
हे ही वाचा : मनोज जरांगेंना GR कसा दिला? 'त्या' दिवशी काय घडलं? छगन भुजबळांचा गौप्यस्फोट, कोर्टात जाण्यावर ठाम
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीत गटबाजी, भाजपमध्ये मतभेद, इस्लामपूरात फोडाफोडीचं राजकारण पेटणार; खुर्चीसाठी कोणाचा दावा प्रबळ?


