मालेगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे, पण महापौर आणि उपमहापौरपदाची निवड अजून बाकी आहे. सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू आहे. अशातच काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहे. काँग्रेसचे 3 आणि भाजप 2 नगरसेवकांनी एकत्र येत 5 नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. याबद्दल तशी नोंद सुद्धा केली आहे. भारत विकास आघाडी नावाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गट नेतेपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस-भाजपचा गट महापालिकेत इस्लाम पार्टीला पाठिंबा शक्यता आहे.
advertisement
मालेगाव पालिका पक्षीय बलाबल
इस्लाम पक्ष - ३५
एम.आय.एम. (AIMIM)- २१
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)- १८
समाजवादी पार्टी (SP)- ०५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -०३
भारतीय जनता पार्टी (BJP) -०२
एकूण -८४
महापौरपदाचं नाव निश्चित
दरम्यान, महापौर पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात मालेगावसाठी सर्व साधारण महिला आरक्षण निघाल्या नंतर महापौर कोण होणार यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरचा निर्णय इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख घेणार आहे. आसिफ शेख यांच्या बंधूच्या पत्नी नसरीन शेख यांना महापौरची संधी देणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. नियमानुसार, महापौर आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर 8 ते 12 दिवसात महापौर सोबत उपमहापौराची निवड करावी लागते. त्यासाठी महापालिकेची विशेष सभेचं आयोजन करावं लागतं. सभेच्या 3 दिवस अगोदर नूतन नगरसेवकांना अजेंडा पाठवला जातो. आता सभा कोणत्या दिवशी बोलावली जाणार आहे आणि त्यात महापौराचे नाव जरी निश्चित मानलं जात असले तरी उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागते याकडे मालेगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे.
