मंचर नगर पंचायतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती झाली असून नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीला देण्यात आलंय. भाजपला नगरसेवक पदाच्या पाच जागा तर राष्ट्रवादीला बारा जागा देण्यात आल्यात. भाजपमध्ये इथे दोन गट पडले असून भाजप नेते संजय थोरात यांच्या नेतृत्वात दुसऱ्या गटाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सात जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत.
advertisement
शिंदे शिवसेनेने येथे स्वतंत्र पॅनल दिला असून नगराध्यक्ष पदासह इतर सर्व सतरा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात येथे नैसर्गिक आघाडी झाली असून ठाकरे सेनेला नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या आठ जागा देण्यात आल्यात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पाच जागा आणि काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या आहेत. असे असले तरी काँग्रेसनेही येथे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीतही बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंचर नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी ११४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पद OBC महिलेसाठी राखीव
उमेदवार
- राष्ट्रवादी भाजप युतीकडून राष्ट्रवादीच्या मोनिका सुनील बाणखेले
- शिंदे शिवसेनेकडून राजश्री दत्तात्रय गांजाळे
- ठाकरे शिवसेनेकडून रजनीगंधा राजाराम बाणखेले
- काँग्रेस पक्षाकडून फरजीन इकबाल मुलानी
- भाजपच्या बंडखोर गटाकडून प्राची आकाश थोरात
- जागृती किरण महाजन यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्क भरला आहे.
