एकनाथ खडसे यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण त्यांना आमच्याशी युती करायची नाही. आम्ही त्यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मात्र ते एमआयएम सोबत देखील युती करू शकतात. त्यांच्या विषयाला आम्हाला काही अडचण नाही. त्यांनी जिल्ह्यात फिरावं, लोकांमध्ये जावं आणि त्यांना काय प्रतिक्रिया मिळतात ते पाहावं. त्यानंतर त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा, असे मंगेश चव्हाण म्हणाले.
advertisement
'सबमाल डब्बे में' अशी एकनाथ खडसे यांची परिस्थिती, चव्हाणांनी डिवचले
गेल्या लोकसभेला त्यांनी भाजपाचेच काम केले. एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात. लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजपा नकोय. त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही. एकनाथ खडसे कधीच एका मतावर ठाम राहत नाहीत. 'सबमाल डब्बे में' अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही मात्र ठरल्याप्रमाणेच युती करणार आहोत. अशी टीका चव्हाण यांनी केली.
निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष चिघळण्याची चिन्हे
जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असताना चव्हाण यांच्या या विधानामुळे खडसे-चव्हाण संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या वक्तव्यामुळे भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि इतर आघाड्यांची रणनीती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
