TRENDING:

कोकाटेंना जामीन मिळाला... पण धडाकेबाज अजित पवारांनी बोलणंच टाळलं, नेमकं कारण काय?

Last Updated:

माध्यमांशी सडेतोड बोलणारे अजित पवार कोकाटेंच्या जामिनानंतर मात्र प्रश्न टाळत थेट गाडीत बसले आणि क्षणात निघून गेले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे, यामुळे त्यांची अटक टळली आहे. मात्र माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम असणार आहे. यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही. दरम्यान मुंबई उच्च न्यायलयाच्या निकालानंतर मात्र पक्ष प्रमुख अजित पवारांना बोलण्याचे टाळले.
News18
News18
advertisement

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी महापौर आणि नगरसेवकांसह अनके कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी अजित पवारांनी सांगलीच्या विकासावर भाषण केले. आगामी महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देखील केली. हा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार यांना कोकाटेंच्या जामिनासंदर्भात प्रश्न विचारसा असता दादांनी हाताने नाही नाही म्हणत माध्यमांना नकार देत कोल्हापूर कडे रवाना झाले.

advertisement

अजित पवार गाडीत बसले आणि क्षणात निघून गेले

अजित पवार हे सांगलीत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी बगल देऊन निघून गेले. त्यामुळे धडाकेबाज अजित पवार काहीही न बोलता निघून गेल्याने, अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार कोकाटे यांच्या जामिनावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कार्यक्रम झाल्यावर माध्यम प्रतिनिधी त्यांची वाट बघत होते कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार बाहेर आले. तेथे कॅमेरे आणि माध्यम प्रतिनिधींना पाहिले. ऐरवी माध्यमांशी सडेतोड बोलणारे अजित पवार थेट गाडीत बसले आणि क्षणात निघून गेले.

advertisement

कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवार यांनी बोलणे टाळले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीच्या शोधात केली भटकंती, शेवटी तरुणानं घेतला शेतीचा निर्णय, आता लाखात कमाई
सर्व पहा

अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यास फारसे इच्छुक नव्हते. त्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहायची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्यासारख्या कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवण्यास विरोध केल्याने अजित पवार यांचा नाईलाज झाल्याने त्यांनी राजीनामा घेतल्याची चर्चा आहे. कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवार यांनी बोलणे टाळले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे..

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोकाटेंना जामीन मिळाला... पण धडाकेबाज अजित पवारांनी बोलणंच टाळलं, नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल