बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीनशे गावात बैठका पार पडल्या. या बैठकीत मुंबईला जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. मंगळवारी बीड जवळील पालवन या गावात बैठक पार पडली. या बैठकीतून एक गाव, एक वाहन ही संकल्पना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था या माध्यमातून केली जात आहे.
advertisement
मुंबईच्या आंदोलनासाठी गावागावात जोरबैठका
आरक्षणाची ही शेवटची लढाई असून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी मुंबईला यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील हे बैठकीच्या गावागावात करीत आहेत. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात येत होत्या, त्या आजतागायत सुरू आहे. बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आहे.
मोर्चाआधी सरकारशी कोणत्याही प्रकारे चर्चा करणार नाही, जरांगेंची भूमिका
मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाणार आहे पण मोर्चाआधी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.
गणपतीत दंगली करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा डाव-लक्ष्मण हाके
बीड शहर जरांगेंनी जाळले, त्याच गोष्टी त्यांना आता गणेशोत्सव काळात मुंबईत करायच्या आहे. गणपतीत दंगली करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला.
