जालना : अजय महाराज बारस्कर यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भर पत्रकार परिषदेत अजय महाराज बारस्कर यांनी जरांगेंच्या काही सहकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप ऐकून दाखवल्या. मी जरांगेंविरोधात इनकम टॅक्सकडे जाणार असल्याचा इशाराही बारस्करांनी दिला, तसंच माझी आणि जरांगेंची लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करण्याचं आव्हानही बारस्कर यांनी दिलं आहे.
advertisement
अजय महाराज बारस्कर यांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'अजय महाराज बारस्कर यांचं आता सगळं बाहेर पडणार आहे, त्याचा हिशोब व्यवस्थित होणार आहे. असल्या भंगार लोकांवर मला बोलायचं नाही, त्याच्यावर बोलायला मी मोकळा नाही, त्याच्यावर बोलायला माझा समाज आहे,' अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.
बारस्करांचं 'लाव रे तो ऑडिओ', जरांगेंच्या जवळच्या माणसाची क्लिप ऐकवली
'त्याच्या इकडच्या माय माऊल्या येणार असून आता त्याचं सगळं बाहेर पडणार आहे, त्याचा हिशोब व्यवस्थित होणार आहे,' असा इशाराही जरांगे पाटील यांनी बारस्करांना दिला आहे.
बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप
‘कोणत्या माता माऊलीला तू अंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिला? कोणत्या माता माऊलीकडून तू पाय दाबून घेतले? हे आम्हाला माहिती आहे. वाळूचे पैसे कुठून आले? मी इनकम टॅक्सकडे जाणार आहे. ईडीकडे जाणार नाही, कारण भाजपचा माणूस म्हणतील. दमणची दारू आणली, संभाजी महाराजांच्या नावावर पैसे खाल्ले. जरांगे तू सुटणार नाही, तुझ्यावर 420 चा गुन्हा आहे. मी जे बोलले ते सगळे पुरावे आहेत. मुंबईत कुणाचं कुटुंब फाईव्ह स्टारमध्ये राहिलं, आम्हाला माहिती नाही का? याचे व्हिडीओ आहेत,’ अशी घणाघाती टीका बारस्कर यांनी जरांगेंवर केली आहे.
जरांगेंचा बुरखा फाटणार? उद्या 11 वाजता बॉम्ब फुटणार, बारस्कारांचा गौप्यस्फोट