Ajay Baraskar : जरांगेंचा बुरखा फाटणार? उद्या 11 वाजता बॉम्ब फुटणार, बारस्कारांचा गौप्यस्फोट
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ajay Baraskar : मनोज जरांगे पाटील यांचं खरं रूप उद्या जनतेसमोर येणार असल्याचा गौप्यस्फोट अजय बारस्कर यांनी केला आहे.
मुंबई, (प्रणाला कापसे, प्रतिनिधी) : अजय बारस्कर (Ajay Baraskar) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यापूर्वी बास्करांनी केलेल्या आरोपांना जरांगे पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं होतं. यात बारस्करांनी बलात्कार केल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. हा आरोप जिव्हारी लागल्यानंतर बारस्करांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत. उद्या (25 फेब्रुवारी) जरांगेंचा बुरखा फाडणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
उद्या जरांगेचं खरं रूप समोर येणार : बारस्कर
अजय बारस्कर म्हणाले, माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. तुमच्यावर आरोप केले जात आहे, तर तुम्हीही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणीला सामोरे जा. मी एक आरोप केला तर जरांगे माझ्यावर खवळले. त्यांनी माझ्या प्रश्नाची फक्त उत्तरं द्यावी. आमच्यानंतर तुम्ही आला आहात, आमच्यावर काहीही आरोप करा. पण राज्याने आणि देशाने पाहिले आहे. माझ्यावर 40 मिनिटं खर्च केले आहे. उद्या 11 वाजता एक बॉम्ब फुटणार आहे. मी येणार नाही, पण उद्या एक मोठा खुलासा होणार आहे. जरांगे जे षडयंत्र म्हणतो., पण उद्या जरांगे कोण आहे, जरांगे कसा आहे, त्याचा बुरखा फाटणार आहे. हा समाज तुला देव माणत आहे हिच लोक तुला दगड मारणार आहे, वेगळी माणसं उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती बारस्कर यांनी दिली आहे.
advertisement
लोणावळ्यात काय डील झाली : अजय बारस्कर
मनोज जरांगे खोटारडा माणूस आहे, तो रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका झाल्या, असे घणाघाती आरोप अजय बारसकर यांनी केले. लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराआड का बैठक घेतली. त्यावर पत्रकारांनी विचारलं तर जरांगे म्हणाले, थंडी वाजत होती. त्यावेळी हजारो तरुण लोणावळ्यात बाहेर झोपले होते. तुला थंडी वाजत होती, तर मीडियाच्या लोकांना आत का नेलं. लोणावळ्यातील त्या बंद बंगल्यामध्ये काय चर्चा झाली. 36 तास तुम्ही वाशीमध्ये मुक्कामी होता. एखाद्या नवरदेवाप्रमाणे वाशीत येऊन थांबला होता. घड्याळ पाहिजे, ड्रेस पाहिजे, असं म्हणत रुसून बसला होता, काय डील चालू होती, अशी कोणती डील झाली. मला ज्या शिव्या द्यायच्या द्या, पण याचं उत्तर द्या, असं आव्हान बारस्करांनी दिलं आहे.
advertisement
बारस्करांनी केलं जरांगेंच्या मागण्यांचं पोस्टमार्टेम
14 फेब्रुवारीला कोट्यवधी लोकांची सभा भरली होती. त्यावेळी जरांगे म्हणाले होते, 'महाराष्ट्रातील समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजामध्ये सरसकट समावेश करावा. कोपर्डीच्या नराधमांना फाशी द्यावी. त्या अंतरवालीच्या सभेत मुळ मागणी ही सरसकट अशी मागणी केली. त्यानंतर लोणावळ्यात झालेल्या बैठकीत सरसकट हा शब्द सोडून दिला. त्यानंतर सगेसोयरे शब्द आणला. जालन्यातून निघाले सरसकट शब्द घेऊन आणि लोणावळ्यात बैठक झाल्यानंतर सगेसोयरे शब्दावर अडून बसले. मग ही मागणी का सोडली. कोपर्डीतील नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी ही मागणी कुणाकडे करावी, ती मागणी न्यायालयात केली पाहिजे.
advertisement
जे 45 बांधवांनी आत्महत्या केली, त्यांना निधी द्यावा, हा निधी सरकारने दिला. पण सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी होती ती कुठे गेली, लोणावळ्याच्या गुप्त बैठकीनंतर ही मागणीही गायब झाली. दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचं सर्वेक्षण करावे असा नियम आहे. राज्य मागासवर्गाकडून हा सर्व्हे व्हावा आणि ज्या जाती आरक्षणाच्या निकषातून बाहेर पडल्या असेल तर त्यांना बाहेर करावं, अशी मागणी जरांगेंनी केली जर असं झालं तर मराठा समाज आरक्षण कोट्यातून बाहेर पडतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 24, 2024 6:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ajay Baraskar : जरांगेंचा बुरखा फाटणार? उद्या 11 वाजता बॉम्ब फुटणार, बारस्कारांचा गौप्यस्फोट


