Ajay Baraskar vs Jarange : बारस्करांचं 'लाव रे तो ऑडिओ', जरांगेंच्या जवळच्या माणसाची क्लिप ऐकवली

Last Updated:

मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारस्कर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर अजय महाराज बारस्कर यांनी पलटवार केला आहे.

बारस्करांचं 'लाव रे ती ऑडिओ', जरांगेंच्या जवळच्या माणसाची क्लिप ऐकवली
बारस्करांचं 'लाव रे ती ऑडिओ', जरांगेंच्या जवळच्या माणसाची क्लिप ऐकवली
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारस्कर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर अजय महाराज बारस्कर यांनी पलटवार केला आहे. पत्रकार परिषद घेऊन बारस्कर यांनी काही ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंवर आणखी काही आरोप केले आहेत.
'जरांगेंनी तुकोबांची माफी मागितली पण ही माफी त्यांनी अहंकारातून मागितली आहे. जरांगेंनी माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. मी विनयभंग केला असा आरोप केला आहे. पण जरांगे खूप खालच्या स्तरावर उतरले आहे. बारस्करांनी 300 कोटींची संपत्ती गोळा केली म्हणतायत, ज्या माणसाकडे 300 कोटी असेल तर तो सरकारकडून 40 लाख रुपये घेईल का?', असा सवाल बारस्कर यांनी विचारला आहे.
advertisement
बारस्करांनी लावली क्लिप
बारस्करांनी महाराजांनी जरांगेंच्या जवळच्या माणसाची फोन रेकॉर्ड ऐकवून दाखवली. जरांगेंच्या गावातील माणसांनी आणि गावातील लोकांनी माझी माफी मागितली आहे, असं म्हणत बारस्कर महाराजांनी ही क्लिप ऐकून दाखवली. 'तुमची माफी मागायची होती, मी म्हटलं आंदोलन चालू ठेवा, मी जरांगेंना तुकोबारायांची शपथ देऊन पाणी प्यायला सांगितलं होतं, पण जरांगेंनी हाकललं. महाराज आता तुम्ही इथं या, सगळी टीम माफी मागतो, समाजासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे. जे घडलं ते घडलं, आम्ही तुमची माफी मागतो', असा संवाद या क्लिपमध्ये आहे.
advertisement
हा फोन कुणाचा होता?
हा फोन जरांगेंसोबत असलेले सरपंच डॉक्टर तारक, संजूभाऊ असे सगळे होते. त्यांनी गोल राऊंड केला आणि सगळ्यांनी माझी माफी मागितली होती. त्यांनी मला असंही सांगितलं, आम्ही तुमचा व्हिडीओ फेसबुकवर टाकू, त्यानंतर मी ही पुरावे गोळा करायला लागलो', असं अजय महाराज बारस्कर म्हणाले.
बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप
'कोणत्या माता माऊलीला तू अंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिला? कोणत्या माता माऊलीकडून तू पाय दाबून घेतले? हे आम्हाला माहिती आहे. वाळूचे पैसे कुठून आले? मी इनकम टॅक्सकडे जाणार आहे. ईडीकडे जाणार नाही, कारण भाजपचा माणूस म्हणतील. दमणची दारू आणली, संभाजी महाराजांच्या नावावर पैसे खाल्ले. जरांगे तू सुटणार नाही, तुझ्यावर 420 चा गुन्हा आहे. मी जे बोलले ते सगळे पुरावे आहेत. मुंबईत कुणाचं कुटुंब फाईव्ह स्टारमध्ये राहिलं, आम्हाला माहिती नाही का? याचे व्हिडीओ आहेत,' अशी घणाघाती टीका बारस्कर यांनी जरांगेंवर केली आहे.
advertisement
'मागच्या वेळी मी आर्थिक आरोप केला नव्हता, मला त्यात पडायचं नव्हतं. मी ब्रेन मॅपिंक, लाय डिटेक्टर, नार्को टेस्टला सामोरं जायला तयार आहे. तुम्ही सुध्या या आणि या टेस्ट करा', असं चॅलेंज अजय महाराज बारस्कर यांनी दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajay Baraskar vs Jarange : बारस्करांचं 'लाव रे तो ऑडिओ', जरांगेंच्या जवळच्या माणसाची क्लिप ऐकवली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement