TRENDING:

Maratha Reservation : मराठा समाज जिंकला, अहवाल मंजूर, नेमकं कसं मिळणार आरक्षण?

Last Updated:

Maratha Reservation : मराठा समाज हा राज्यभरात 28 टक्के असल्याचं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला मागासवर्गीय आयोगाला आढळून आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाचा मसुदा कॅबिनेटच्या बैठकीत मांडण्यात आला. या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता हा मसुदा चर्चेसाठी अधिवेशनात (Maratha Reservation Special Assembly session) मांडण्यात येणार आहे. या अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, हे जाणून घेऊया. मराठा समाज हा राज्यभरात 28 टक्के असल्याचं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला मागासवर्गीय आयोगाला आढळून आलं आहे.
मागसवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
मागसवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
advertisement

सुमारे 52 टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत. त्यामुळे राज्यातील 28 टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणं पुर्णपणे असामान्य ठरेल, अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे.

Maratha Reservation : मागसवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी, 'असं' मिळू शकतं मराठा समाजाला आरक्षण

दुसरीकडे या अधिवेशनापूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते ओबीसी आरक्षणावर ठाम आहेत. अधिवेशनात आधी सगेसोयरेची मागणी मान्य करा आणि नंतर मागासवर्ग आयोगाचा मसुदा चर्चेसाठी घ्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

advertisement

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून देखील मराठा समाजाला कशा पद्धतीने 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देता येऊ शकतं, यासाठी विविध राज्यातील उदाहरणं या मसुद्यात नमूद केली आहेत. थोडक्यात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडूनही टिकणारं आरक्षण देता येऊ शकतं. राज्यात शेतकरी आत्महत्या केलेल्या पैकी 94 टक्के व्यक्ती या मराठा समाजातील असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

पिवळी रेशन कार्ड धारकांपैकी 21.22 टक्के कुटुंबं ही मराठा समाजातील आहेत. या आकडेवारीवरून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होतंय,असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. दारिद्र्य रेषेखालील एकूण कुटुंबांपैकी मराठा समाजाची 18.09 टक्के इतकी कुटुंबं आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : मराठा समाज जिंकला, अहवाल मंजूर, नेमकं कसं मिळणार आरक्षण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल