मूळचा पनवेल येथील असलेला श्रीनाथ म्हात्रे कॉलेज लाईफपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. 2016 पासून त्याने अनेक एकांकिकांना संगीत दिलं आहे. रामनारायण रूईया महाविद्यालयात शिकत असताना आणि नाटकात काम करत असताना त्याने दिग्गज लेखक, दिग्दर्शक आणि कलाकरांसोबत काम केलं. यामध्ये रामचंद्र गावकर, प्राजक्त देशमुख, रणजीत पाटील, अजय कांबळे, ललीत प्रभाकर, अनिकेत पाटील आणि चंद्रकांत पंडित यांचा समावेश होतो. आता 'जॉली एलएलबी 3'च्या माध्यमातून त्याला थेट बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला आहे."
advertisement
याबाबत बोलताना श्रीनाथ म्हणाला, 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटात मी पार्श्वसंगीत देण्याचं काम केलं आहे. हा चित्रपट करताना खरचं खूप मजा आली. मुळातचं मी जॉली एलएलबी 1 आणि जॉली एलएलबी 2 या दोन्ही चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. या सिरीजचा भाग होण्याची संधी मिळाली तेव्हा माझा आनंद द्वीगुणित झाला. अशा आशयाचे चित्रपट मला स्वत:ला खूप आवडतात. सौरभ शुक्ला, अक्षय कुमार, अर्शद वारसी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून मला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी खरचं खूप आनंदाची गोष्ट आहे."
श्रीनाथने दिलेल्या माहितीनुसार, जॉली एलएलबी 3 या चित्रपटाचे सह निर्माते नरेन कुमार यांनी त्याला संधी दिली. नरेन कुमार एक मराठी चित्रपट करत आहेत. 'भुतनभयम' असं या चित्रपटाचं नाव असून रामचंद्र गावकर यांचं दिग्दर्शन आहे. या चित्रपटासाठीही श्रीनाथ संगीत देण्याचं काम करत आहे. श्रीनाथचं काम आवडल्याने नरेन कुमार यांनी त्याला जॉली एलएलबी3च्या टीममध्ये संधी दिली.