TRENDING:

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण, समाधान महाराज शर्मांचे कीर्तन, जरांगे पाटील मस्साजोगला जाणार

Last Updated:

Santosh Deshmukh Murder Case: समाजसेवेच्या माध्यमातून गावाचा गाडा हाकणारे सरपंच संतोष देशमुख यांची गतसाली ९ डिसेंबर रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. तिथीनुसार त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. यानिमित्त समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस हे मस्साजोगला जाण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरण
advertisement

समाजसेवेच्या माध्यमातून गावाचा गाडा हाकणारे सरपंच संतोष देशमुख यांची गतसाली ९ डिसेंबर रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. त्यांना मारताना मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा पार केली. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली, अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्यासह अन्य सात आरोपींना अटक करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाले तरीही अजूनही आरोप निश्चित करण्यात आलेली आहे.

advertisement

सरपंच देशमुख यांच्या पुण्यतिथीला समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन

देशमुख कुटुंबियांसाठी आजचा दिवस अत्यंत भावनिक आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्यांचे लहान बंधू धनंजय देशमुख यांच्यावर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

advertisement

कृष्णा आंधळेला बेड्या ठोकण्यात सरकारला अद्याप यश नाही

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचे आक्रमक मोर्चे निघाले. देशमुख यांना न्याय देण्यासाठी मराठवाड्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला. महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी मोर्चे निघाले. दहावीची परीक्षा तोंडावर असूनही सरपंचांची लेक वैभवी देशमुख हिनेही देखील मोर्चांमध्ये सहभागी होऊन वडिलांच्या न्यायासाठी सरकारपुढे पदर पसरला. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्याला बेड्या ठोकण्यात अद्याप यश आलेले नाही.

advertisement

वाल्मिक कराड याच्यावरील आरोपांमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाले. देशमुख यांना अमानुष मारहाण करताना मारेकऱ्यांनी वाल्मिक कराड याला फोन केल्याचे समोर आले. तसेच पवनचक्की प्रकरणात वाल्मिक कराड याला खंडणी देण्यासाठी काही फोनकॉल झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले. कराड याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर आणि देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो, चित्रफिती समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अधिवेशनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण, समाधान महाराज शर्मांचे कीर्तन, जरांगे पाटील मस्साजोगला जाणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल