नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी गरबा-दांडियांचं आयोजन केलं जातं. अशा कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी साजेसे कपडे देखील लागतात. मॅचिंग सेंटर दुकानाच्या मालकांनी हीच बाब लक्षात घेऊन ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या दुकानात महिलांसाठी स्टायलिश जॅकेट्स फक्त 250 पासून मिळत आहेत. जॅकेट्सच्या 200 डिझाइन्स उपलब्ध असून, फ्रंट वर्क असलेले जॅकेट 250 तर फ्रंट आणि बॅक वर्क असलेलं जॅकेट 350 पासून मिळत आहेत.
advertisement
Pitru Paksha 2025: विक्रेते जोमात तर ग्राहक कोमात! भाज्यांचे दर वाढण्यामागे काय आहे कारण?
अधिक आकर्षक लूकसाठी 'फिशकट जॅकेट'चा पर्याय उपलब्ध असून त्यांची किंमत 750 रुपये आहे. ही सर्व जॅकेट्स फ्री साईज आणि प्लस साईजमध्ये उपलब्ध आहेत. नवरात्रीसाठी अत्यंत उपयुक्त आणि परंपरागत चनिया-चोळी 1000 रुपयांपासून विकली जात आहे. याशिवाय स्कर्ट्स 1000 पासून आणि प्रीमियम क्वालिटीचे हेवी वर्क असलेले ब्लाउज 1000 पासून उपलब्ध आहेत.
इंडो-वेस्टर्न जॅकेट्स आणि जीन्सची किंमत प्रत्येकी 2000असून, हे पोशाख पूर्ण वर्क केलेले आहेत. केवळ कपडेच नव्हे तर या दुकानात ओढण्या आणि पारंपरिक छत्र्या देखील उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी मेन्स जॅकेट्स आणि कुर्ते प्रत्येकी 1050 पासून मिळत आहेत. महिलांसाठी शॉर्ट कुर्ती, साइड कट कुर्ती आणि लाँग कुर्ती यांची किंमत 1200 पासून सुरू होते.
दुकान मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, होलसेल खरेदीसाठी कमीत कमी 10,000 रुपयांची खरेदी बंधनकारक आहे. कपड्यांचे दर अतिशय परवडणारे आहेत. त्यामुळे होलसेल खरेदी करून चांगला नफा मिळवण्याची संधी व्यावसायिकांना मिळू शकते. हे दुकान दादर वेस्ट येथील रानाडे रोडवर सुरती हॉटेलच्या बाजूला आहे.