TRENDING:

MBA फायनान्स पण नोकरीपेक्षा निवडला वेगळा मार्ग, ममता आहे आज हॉटेलची मालकीण!

Last Updated:

संसाराच्या गाड्यात स्वप्न अपुरी राहतात. पण एमबीए फायनान्स झालेल्या विवाहित महिलेनं संसारातून वेळ काढून स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाकुर्ली :  सध्या अनेक जण वेगवेगळ्या पदवी घेऊन खासगी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. बऱ्याच वेळा संसाराच्या गाड्यात स्वप्न अपुरी राहतात. पण एमबीए फायनान्स झालेल्या विवाहित महिलेनं संसारातून वेळ काढून स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.  ममता उतेकर असं हा हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
advertisement

ठाकुर्ली मधील ममता उतेकर ही महिला गेले वर्षभर हा स्वतःचा व्यवसाय करत आहे. ममता यांचं शिक्षण एमबीए फायनान्स मधून पूर्ण झालं. शिक्षण घेतल्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यापासून त्या गृहिणी म्हणून कार्यरत होत्या. पण संसाराला हातभार लागला पाहिजे, यासाठी ममता यांनी हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याच्या साथीने त्यांनी तावरान नावाचं हॉटेल सुरू केलं.  सुरुवातीला लोकांना चव कळायला वेळ गेली. परंतु आता मात्र इथे हमखास शनिवार आणि रविवारी नॉनव्हेज खाण्यासाठी गर्दी असते. या तिच्या हॉटेलची खासियत म्हणजे इथं, तुम्हाला चिकन वडापावमध्ये खूप व्हरायटी मिळेल. हा चिकन वडापाव अगदी स्वादिष्ट असून याच्यासोबत मिळणारा मिरचीचा ठेचा तर अप्रतिम आहे. त्याच बरोबर इथं सुरमई थाळी, पापलेट थाळी, चिकन आणि मटन थाळी अशा व्हरायटीमध्ये थाळी उपलब्ध आहेत. यांची किंमत फक्त इथे 150 ते 200 रुपयांपासून उपलब्ध आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

' एमबीए करत असताना असा काही विचार केला नव्हता की स्वतःचा व्यवसाय करावा. लग्न झाल्यानंतर माझ्या पतीने मला खूप मदत केली, सपोर्ट केला आणि इथूनच हॉटेल तावरानची कथा सुरू झाली. सध्याच्या जमान्यात स्वतःचा काहीतरी व्यवसाय असणे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. ' असं ममता उतेकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MBA फायनान्स पण नोकरीपेक्षा निवडला वेगळा मार्ग, ममता आहे आज हॉटेलची मालकीण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल