याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात साधारण 3 हजार 400 पैकी 864 फ्लॅट्स असलेल्या नव्या इमारती तयार झाल्या आहेत. या इमारतींचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. नायगावमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला तीन वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा डिसेंबर 2025 मध्ये देण्याचं नियोजन होतं. मात्र, आता दिवाळीपूर्वीच म्हणजे जवळपास तीन महिने अगोदर ताबा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती म्हाडाचे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील भडांगे यांनी माध्यमांना दिली.
advertisement
चाळीतील एक रहिवासी म्हणाले, "आम्ही जन्मापासून या 180 चौरस फुटांच्या घरात आयुष्य काढलं. आता आमच्या मुलांनी मोठ्या घराचा आनंद घ्यावा, अशी इच्छा होती. म्हाडामुळे ती पूर्णत्वाकडे जातं आहे. दिवाळीपूर्वी घराचा ताबा मिळाल्यास अगदी धूमधडाक्यात आम्ही दिवाळी साजरी करू."
आणखी एका रहिवाशाने म्हाडा यंत्रणेचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "म्हाडाकडून वेळेत भाडं मिळालं आहे. आता घर देखील तीन महिने अगोदर मिळत आहे. ज्या परिसरात आयुष्य गेलं त्याच ठिकाणी नवीन मोठं घर मिळत असल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही."