TRENDING:

भाजप मुस्लिम मोहल्ल्यात सांगत होते, पैसे घ्या पण मतदान करू नका, जलील यांनी व्हिडीओ दाखवला, सावेंनी आरोप फेटाळले

Last Updated:

अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन पैशाचे वाटप होत असल्याचे व्हिडीओ इम्तियाज जलील यांनी दाखवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून नोटांचा पाऊस पाडला गेला, असा गंभीर आरोप करून एमआयएमचे नेते उमेदवार इम्तियाज जलील यांनी महिलांना पैसे वाटप होत असलेला व्हिडीओच पत्रकार परिषदेत दाखवला. सत्ताधारी पक्षाचे नेते मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटप करीत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच कसे बोलत नाहीत किंबहुना निवडणूक आयोग कारवाई का करीत नाही? असा सवाल जलील यांनी विचारला.
इम्तियाज जलील
इम्तियाज जलील
advertisement

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील मतदान बुधवारी संपन्न झाले. अनेक ठिकाणी पैशांचे वाटप सुरू असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या.औरंगाबाद पूर्वमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन पैशाचे वाटप होत असल्याचे व्हिडीओ इम्तियाज जलील यांनी दाखवले.

अनेक मुस्लिम महिलांचे आधार कार्ड भाजपा कार्यालयात जमा करून घेत असतानाचे व्हिडीओ जलील यांनी दाखवले. तसेच आम्ही तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही मतदान करू नका, असे सावेंचे कार्यकर्ते मुस्लिम महिलांना म्हणत असल्याचा दावा जलील यांनी केला. तसेच दलित वस्तीत देखील असेच प्रकार काल दिवसभर सुरू होते, असा आरोप जलील यांनी केला.

advertisement

जय श्रीरामचे नारे देऊन पैसे वाटत होत असल्याचे देखील ते म्हणाले. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या भाजपा कार्यालयात होत होता. परंतु तरीही पोलिसांनी काही दखल घेतली नाही आणि निवडणूक आयोगाने देखील कारवाई केली नाही, असे जलील म्हणाले. तसेच लोकसभेतसुद्धा माझा पराभव जनतेने नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे आणले होते, त्यामुळे झाला, असे म्हणत पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या लोकांना पण सरकारकडून सांभाळून घेण्याचे आदेश होते, असेही जलील म्हणाले.

advertisement

अतुल सावे यांनी आरोप फेटाळले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

इम्तियाज जलील यांनी पैसेवाटपाचे केलेले आरोप अतुल सावे यांनी स्पष्टपणे फेटाळले. आमच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे वाटप झालेले नाही. जलील करीत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना पैसे वाटपाचा अनुभव असेल, मला नाही. मी कधीही असे प्रकार करून निवडणूक जिंकलेल्या नाहीत. त्यांना असे प्रकार करून निवडणूक जिंकण्याची सवय असेल, असे सांगत अतुल सावे यांनी जलील यांचे आरोप फेटाळले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप मुस्लिम मोहल्ल्यात सांगत होते, पैसे घ्या पण मतदान करू नका, जलील यांनी व्हिडीओ दाखवला, सावेंनी आरोप फेटाळले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल