बीडच्या शिरुर तालुक्यातील वडाळी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचे घराजवळून अपहरण करत तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे, गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी देखील पालकांनी तक्रार केली होती, परंतु, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तिसर्यांदा हा प्रकार घडला.
advertisement
पीडित मुलगी घराच्या पाठीमागील बाजूस थांबलेली असतांना समोरुन आलेल्या दोघांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला. यानंतर तिला गुंगी आल्यासारखे झालं. त्यानंतर त्या दोघांनी तिला ओढत नेवून जवळच्या शेतात बांधून टाकलं तसंच तिचा विनयभंग देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आता या प्रकरणात देखील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
