पहिली मोठी चूक म्हणजे जास्त मीठाचे सेवन. दररोजच्या जेवणात मीठाचे प्रमाण आधीच जास्त असून, पापड, लोणचे, फास्ट फूड, चिप्स यांमुळे हे प्रमाण आणखी वाढते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रौढ व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ सेवन करू नये. जास्त मीठामुळे शरीरात पाणी धरले जाते आणि रक्तवाहिन्यांवर ताण वाढतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. याशिवाय तणाव हा देखील प्रमुख कारणांपैकी एक आहे. कामाचा ताण, घरगुती जबाबदाऱ्या आणि आर्थिक दडपणामुळे शरीरात कॉर्टीसोल हार्मोन वाढते, ज्याचा थेट परिणाम BP वर होतो.
advertisement
दरम्यान, अपुरी झोप ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली असून रक्तदाब वाढीस कारणीभूत ठरते.रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा सोशल मीडियाचा वापर, तसेच अनियमित झोपेचा दिनक्रम यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळत नाही. परिणामी हृदयावर ताण येतो आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. त्यासोबतच जंक फूड आणि तेलकट पदार्थांचे वाढते सेवन हे सुद्धा एक गंभीर समस्या आहे. प्रोसेस्ड आणि फ्राइड पदार्थांमुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) वाढते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात.
अशा स्थितीत रक्तप्रवाह अडथळ्याने चालू राहतो आणि BP हळूहळू वाढत जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्यायामाचा अभावही उच्च रक्तदाबाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. आधुनिक जीवनशैलीत अनेकजण तासन्तास एका ठिकाणी बसून काम करतात. त्यामुळे वजन वाढते, रक्ताभिसरण मंदावते आणि हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. संशोधनानुसार, दररोज 30 मिनिटे चालणे, हलका व्यायाम किंवा योग केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
नियमित व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका 20 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. तज्ज्ञांचे मत आहे की या पाच चुका — जास्त मीठ, तणाव, अपुरी झोप, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव. जर या सवयी टाळल्या तर उच्च रक्तदाब सहज नियंत्रणात राहू शकतो. योग्य आहार, पुरेशी झोप, मानसिक ताण कमी करणे आणि नियमित हालचाल ही चार मूलभूत तत्त्वे पाळल्यास हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहते. नागरिकांनी आपल्या दिनचर्येत छोट्या-सोहळ्या सुधारणा केल्या तर गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.