मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊन या जागा वाटपाच्या बैठकांच्या फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी कुठलेही सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर ठरलेले नसले तरी ठाकरेंची शिवसेना ही सत्तरच्या आसपास जागा मनसेला सोडण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्राथमिक चर्चेत ७० जागा सोडण्याची तयारी, दुसरीकडे मनसेची १२५ लोकांची यादी तयार
advertisement
मनसेकडून साधारणपणे उमेदवार असलेल्या आणि लढू शकणाऱ्या तसेच ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा जवळपास १२५ लोकांची यादी तयार केली आहे. यापैकी जवळपास ७० जागा मनसेला सोडण्यास शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा पुढे जातील तेव्हा मनसे यावर समाधानी असणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे.
चुरशीचे प्रभाग
प्रभाग क्रमांक १९३
- याही वेळी सलग तिसऱ्यांदा हा प्रभाग ओबीसी झालाय
- माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचा हा मतदारसंघ
- हेमांगी वरळीकर यांनाच पुन्हा ठाकरे सेनेकडून उमेदवारीची शक्यता आहे ..
- तर शिंदे सेनेकडून उपविभाग अध्यक्षा निकिता घडशी यांचे नाव चर्चेत आहे
- या प्रभागात भाजपकडे कोणी तगडा उमेदवार सध्या नाही
प्रभाग क्रमांक १९५
- मागच्यावेळी अनुसूचित जातीकरता आरक्षित असलेला प्रभाग यंदा राखीव झालाय
- शिवसेनेचे संतोष खरात माजी नगरसेवक होते
- खरात सध्या शिंदे सेनेत आहेत . आणि तो मतदारसंघ शिवसेना लढवण्यासाठी इच्छुक आहे .
- या मतदारसंघातून शिवसेनेकडून संतोष खरात आणि दत्ता नरवणकर इच्छुक आहेत . भाजपकडून विजय बांदिवडेकर आणि ठाकरे सेनेकडून विजय भणगे यांची नावे चर्चेत आहेत. तर मनसे देखील या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे
प्रभाग क्रमांक १९६
- यंदा हा प्रभाग महिला आरक्षित झालाय
- माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर होते
- महिला आरक्षित झाल्यामुळे चेंबूरकर यांचा पत्ता कट झालाय
- या प्रभागात ठाकरे सेना उमेदवार देणार असून आकर्षिता अभिजित पाटील यांच नाव चर्चेत आहे. तर भाजपा या प्रभागासाठी इच्छुक असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
प्रभाग क्रमांक १९७
- हा प्रभाग महिला आरक्षित आहे
- इथे मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले पण पुढे शिवसेनेकडे गेलेल्या दत्ता नरवणकर माजी नगरसेवक आहेत
- नरवणकर सध्या शिंदेसेनेत आहेत
- या प्रभागात शिवसेनेने दावा केला असून शिवसेनेकडून वनिता नरवणकर, अनिता नायर इच्छुक आहेत .
- तर मनसेच्यावतीने रचना विकास साळवी इच्छुक असून ठाकरे सेनेकडून श्रावणी छोटू देसाई आणि भाजपच्यावतीने विमल पवार यांची नावे आघाडीवर आहेत.. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहेव. त्यामुळे इथे चुरस अधिक असेल . आता हा प्रभाग मिळवण्यात सेना मनसेत कोण बाजी मारेल ते पाहणं महत्वाच ठरणार आहे ..
प्रभाग क्रमांक १९८
- हा प्रभाग ओबीसी महिला राखीव आहे.
- माजी महापौर स्नेहल आंबेकर यांचा मतदार संघ
- यंदा ओबीसी आरक्षण लागल्यामुळे त्यांचा पत्ता कट झालाय.
- या प्रभागात मनसेचे प्राबल्य अधिक असल्याने मनसे या जागेसाठी आक्रमक राहील
- मनसेच्या अस्मिता येडगे, ठाकरे सेनेच्या अबोली गोपाळ खाड्ये, भाग्यश्री संदीप वरखडे यांची नावं चर्चेत आहेत. तर सेना भाजप युतीत हा प्रभाग शिंदेसेनेकडे राहण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १९९
- हा प्रभाग महिला आरक्षित आहे.
- ठाकरे सेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा मतदार संघ
- या मतदारसंघात किशोरी पेडणेकर, अबोली खाड्ये, समृद्धी कोयंडे इच्छुक आहेत. तर मनसेच्यावतीने संगीता दळवी आणि शिंदेसेनेच्यावतीने वंदना गवळी आणि भाजपकडून आरती पुगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने चुरसही वाढणार आहे .
