नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज महेंद्र शिर्के नावाच्या तरुणाने गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट होती.
कोण राज ठाकरे कोण उद्धव ठाकरे कोण भाजप मी कोणालाच ओळख नाही. मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी झटलेल्या एकाच व्यक्तीला मी ओळखतो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाकी सगळे चोर आहेत. राज ठाकरे कपडे बदलण्यासारख्या भूमिका बदलतात असं म्हणत त्याने वाईट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.
advertisement
मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा तरुण नालासोपारा येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्याला गाठले आणि तिथेच त्याचा पद्धतशीर चोप दिला. इतक्यावरच न थांबता, कार्यकर्त्यांनी त्याला अर्धनग्न करून रस्त्यावरून त्याची धिंड काढली.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या घटनेनंतर मनसे पदाधिकारी किरण नकाशे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, "राजसाहेब आणि उद्धव साहेबांबद्दल अश्लील भाषेत लिहिणाऱ्या या विकृत तरुणाच्या आम्ही शोधात होतो. तो मराठी असो वा अमराठी, आमच्या दैवतांबद्दल बोलताना जर कोणी पातळी ओलांडली, तर त्याची अशीच मिरवणूक निघणार. याला हीच भाषा समजते."
ठाकरे कुटुंबातील नेत्यांबद्दल चुकीचे विधान केल्याने मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या मुद्द्यावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. नालासोपारा परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
