नागपूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. दोनशे पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देणार असल्याचं सांगितलं पण मनसेने राज्यात जवळपास १२८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता काही ठिकाणी जिथं मनसेचे उमेदवार आहेत तिथं भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मनसेच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
भाजपने नागपूर दक्षिण आणि हिंगणा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दोन्ही मतदारसंगात ईव्हीएमवर मनसेचं इंजिन असलं तरी मनसेकडून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला जाईल. आपल्याच अधिकृत उमेदवाराविरोधात उभा असणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना मनसेने पाठिंबा दिला आहे.
हिंगण्यात मनसेचे बीजराम किंकर हे तर नागपूर दक्षिण मध्ये आदित्य दुरुगकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र आता मनसेने हिंगण्यात भाजपचे उमेदवार समीर मेघे यांना तर दक्षिण नागपूरमध्ये मोहन मते यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या दोन मतदारसंघात मनसेचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील.
