नालासोपाराच्या पेल्हारमध्ये तब्बल दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपाने मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आणले असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यांच्याकडून दहा लाख 9 हजार रुपयांची रक्कम जप्त केली असून पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे पैसे असल्याचा सांगितलं असून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
advertisement
भाजप कार्यकर्त्याच्या स्कुटीमध्ये रोकड सापडली
नालासोपारा पूर्वेकडील प्रभाग क्रमांक १९ मध्ये सोमवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास काही जण मतदारांना पैसे वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या सोहेब मेमन यांना मिळाल्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकर्ते अमोल कसबे यांची स्कुटी अडवली. त्यांच्या गाडीच्या डिकीमध्ये दहा लाख 9 हजार रुपयांची रोकड सापडली. त्याचबरोबर काही भाजपच्या चिन्ह असलेल्या पिशव्या पॅम्प्लेट सापडले असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला.
पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप भाजपाने फेटाळले
तर, नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार इथं पकडण्यात आलेले पैसे हा बहुजन विकास आघाडीचा स्टंट असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार मनोज पाटील यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विवांतामध्ये सुद्धा अशाच प्रकारे बहुजन विकास आघाडीने 25 कोटी भाजपने आणल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यात कोणतेही तथ्य अजून आढळून आले नसल्याचा खुलासा मनोज पाटील यांनी केला आहे.
"मला माहिती नाही माहिती बहुजन विकास आघाडीचे आरोप आहेत. ते तुम्हाला माहित असेल की, विवंतामध्ये 25 कोटी वाटायला आणले होते, अशा पद्धतीचा बालिश आरोप केले होते आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्याचे उत्तर वसई विरारच्या जनतेनं तीनही विधानसभेमध्ये दणदणीत दिला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करणं, ते पराभव समोर दिसत असल्याने उत्तर येणाऱ्या 15 तारखेनंतर 16 तारखेला मतपेटीतून दिसेल, असं मनोज पाटील म्हणाले.
तसंच, निवडणूक आली की बहुजन विकास बहुजन विकास आघाडीचे हे सगळे स्टंट आहेत, ते सुरू होतात आणि त्यामुळे माझा सल्ला आहे की आता हे घासून पुसून गुळगुळीत झालेले विषय आता नवीन काहीतरी स्टंट शोधून काढा जो लोकांना पटेल, असा टोलाही पाटील यांनी बविआला लगावला.
