कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १४ गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविलं आहे. खासदार बाळ्या मामा म्हणाले, सहा महिन्यांनी गावं बाहेर काढण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीमधील 27, नवी मुंबई मधील 14 आणि अंबरनाथमधील 5 गावे मिळून वेगळी महानगरपालिका, नगरपालिका करा... या गावांची वेगळी महानगरपालिका किंवा नगरपालिका केली तर त्यांना सुविधा मिळतील त्यांचा विकास होईल. या गावांना शासनाच्या मदतीची देखील गरज पडणार नाही. कारण या भागात मोठी एमआयडीसी आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या टॅक्सवरच ही महानगरपालिका चालेल.
advertisement
निवडणुका रद्द करा..., खासदार बाळ्या मामांची मागणी
सरकार झोपले आहे का? एकीकडे हे सांगतात गावे घेतली पाहिजे, हेच बाहेर काढतात..ही फरफट थांबावा ना कोणाचा पैसा आहे? कशाला परत परत खर्च.. तुमचा पैसा आहे का? परत निवडणुका लावा.. त्यापेक्षा या निवडणुका रद्द करा आणि भविष्यात वेगळी पालिका बनवून निवडणुका घ्या... यात सर्व राजकारण चालूं आहे, त्यामुळेच हे सर्व चालू आहे आणि आपण राज्याचे नुकसान करत आहे, असे देखील बाळ्या मामा म्हणाले.
कोणती आहेत ही १४ गावे?
नावाळी, वाकळण, बाम्मली,दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू,नारीवली, भंडार्ली, उत्तर शीव, बाळे, नागांव, गोठेघर अशी गावांची नावे आहेत.
काय म्हणाले होते गणेश नाईक?
आम्हाला ती 14 गावं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नको. नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक झाल्यानंतर ही सर्व गाव आपण बाहेर काढू. निश्चित सर्व गाव बाहेर निघतील, असा दावा त्यांनी छातीठोकपणे केला. निवडणुकीनंतर पुढील 6 महिन्यात ही गावं बाहेर काढण्यात येतील असे ते म्हणाले. कुणाच्यातरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्टी आणि त्याचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी केला.