Solapur Flood : कांदा, मक्कासह शाळेचं दप्तर गेलं वाहून, सिना नदीचं रौद्ररूप पाहणाऱ्या वैभवनं सगळं सांगितलं VIdeo
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठची गावे, शेती पाण्याखाली गेली.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठची गावे, शेती पाण्याखाली गेली. मोठ्या कष्टाने वडिलांनी 4 एकरात कांदा, ऊस, मका आणि आंब्याची लागवड केली होती. शाळा सुरू झाल्यावर नवीन दप्तर, वह्या, शालेय साहित्य घेऊन दिले होते. पण या पुरामध्ये सर्व काही वाहून गेलं आहे. सीना नदीला आलेल्या महापुराचा थरार मोहोळ तालुक्यातील आष्टी गावात राहणाऱ्या वैभवने सांगितला.
सीना नदीला आलेल्या महापुराचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. 16 ते 18 दिवसांपासून नदीकाठच्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी गावाला सुद्धा या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. आष्टी गावात राहणाऱ्या 13 वर्षीय वैभव देशमुख या चिमुकल्याच्या वडिलांनी 4 एकरात कांदा, मका आणि उसाची लागवड शेतामध्ये केली होती. पण अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये शेतामध्ये लागवड केलेली पिके वाहून गेली आहेत. तसेच आंब्याची बाग देखील पाण्याखाली गेल्याने तिचं देखील नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या या महापुरात वैभवाच्या घराचे देखील नुकसान झाले आहे.
advertisement
सीना नदीचं पाणी वैभव याच्या घरच्या उंबरठ्यापर्यंत आलं होतं. तेव्हा वैभवचे आई-वडिलांनी जीवनावश्यक वस्तू घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढत बाहेर आले. नदीला आलेल्या महापुरात वैभव यांच्या 10 कोंबड्यादेखील वाहून गेल्या आहेत. शाळा चालू झाल्यावर वडिलांनी नवीन दप्तर, वह्या आणि शालेय साहित्य घेऊन दिले होते. ते देखील नदीला आलेल्या महापुरात वाहून गेलं आहे. महापुराचा थरार सांगत असताना वैभवचा कंठ भरून आला होता.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 04, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Solapur Flood : कांदा, मक्कासह शाळेचं दप्तर गेलं वाहून, सिना नदीचं रौद्ररूप पाहणाऱ्या वैभवनं सगळं सांगितलं VIdeo