Sankashti chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीला बदलणार सूर्य-चंद्राची चाल; 3 राशीच्या लोकांना होईल फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sankashti chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय व्रत आहे. 'संकष्टी' या शब्दाचा अर्थ आहे 'संकटांवर मात करणारी' आणि 'चतुर्थी' म्हणजे तिथी. त्यामुळे हे व्रत सर्व संकटे, अडचणी आणि बाधा दूर करण्यासाठी विशेष फलदायी मानले जाते. संकष्टी लाडक्या गणरायाची पूजा केली जाते.
या वर्षी संकष्टी चतुर्थीचे व्रत 10 ऑक्टोबर रोजी साजरे केले जाईल. या दिवशी विवाहित महिला तसेच कित्येक गणेशभक्त उपवास ठेवतात. संकष्टीचा उपवास महाराष्ट्रात सर्वत्र केला जातो. रात्री चंद्र दर्शन केल्यानंतरच उपवास सोडला जातो. यंदा संकष्टी चतुर्थीला एक मोठा आणि दुर्मिळ योग जुळून येत आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह एकाच वेळी आपली चाल बदलणार आहेत.
advertisement
advertisement
वृषभ (Taurus) - संकष्टी चतुर्थीचा हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. तुमच्यासाठी नोकरी-व्यवसायात प्रगतीची प्रबळ शक्यता निर्माण होईल. जे लोक नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी काळ खूप शुभ असेल. नवीन मालमत्ता, घर किंवा सदनिका खरेदी करण्यासाठी देखील वेळ चांगला आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध अधिक मजबूत होतील.
advertisement
कर्क (Cancer) - कर्क राशीच्या लोकांसाठीही संकष्टी चतुर्थीला जुळून आलेला हा योग चांगले दिवस घेऊन येणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी काळ अनुकूल राहील. आई-वडिलांच्या सहकार्याने केलेली कामे यशस्वी होतील. व्यवसायात नफा कमावण्याच्या अनेक शुभ संधी तुम्हाला मिळू शकतात. रोजगाराच्या शोधात असलेल्या लोकांनाही काही चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
तूळ (Libra) - तूळ राशीच्या लोकांच्या वाणी आणि व्यवहारात चांगले बदल दिसून येतील. तुम्ही तुमच्या उत्साह आणि मधुर वाणीने लोकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात तुमच्या सर्जनशीलतेमुळे वरिष्ठ अधिकारी वर्ग प्रसन्न राहील. विवाहित लोकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. तुमच्या दांपत्य जीवनात गोडवा वाढेल. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद दूर होईल आणि जोडीदाराच्या सहकार्याने तुमचे एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










