Mhada Lottery: म्हाडाची घर लॉटरी योजना जाहीर, अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या...
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे २०२५-२६ साठी घरांच्या लॉटरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), कमी उत्पन्न (LIG), मध्यम उत्पन्न (MIG) आणि उच्च उत्पन्न (HIG) गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बाजारभावाच्या तुलनेत स्वस्त दरात घर मिळवण्याची संधी ही योजना देते.

म्हाडाच्या या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, ठाणे, कोकण, औरंगाबाद, नाशिक आणि इतर विभागांतील विविध घरांची लॉटरीद्वारे सोडत होणार आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक नागरिकांनी नियमपूर्वक अर्ज भरून आपले स्वप्न साकार करण्याची संधी साधावी.
अर्ज करण्याची प्रक्रिया-
advertisement
म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://lottery.mhada.gov.in) जाऊन स्वतःची नोंदणी करावी.
युजरनेम व पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करून आपल्यासाठी योग्य योजना निवडावी.
advertisement
आवश्यक माहिती भरून, संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे (₹500 ते ₹1500 पर्यंत).
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी सोडत होईल व विजेते जाहीर होतील.
advertisement
आवश्यक कागदपत्रे-
advertisement
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे. सर्व माहिती खरी असावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज अमान्य ठरू शकतो.
advertisement
अधिक माहिती व अर्जासाठी भेट द्या:
ही योजना सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळवून देण्यासाठी एक मोठी संधी आहे. लवकरात लवकर अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 04, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mhada Lottery: म्हाडाची घर लॉटरी योजना जाहीर, अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या...