दर तासाला 615 विनातिकीट प्रवासी
या कारवाईच्या आलेखानुसार पाहिले तर मध्य रेल्वेवर दर तासाला 615 विनातिकीट प्रवासी पकडले जातात. तिकीट बुकिंगवरील कारवाई हा मध्य रेल्वेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल महिन्यात 4 लाख 29 हजार तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईतून 27 कोटी 74 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच मे महिन्यात 5 लाख 11 हजार तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
advertisement
निळ्या पाण्याची गोष्ट! वीज पडल्याची अफवा अन् Viral Video मागील सत्य
मुंबई विभागातून सर्वाधिक दंड
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला 4 लाख 7 हजार प्रकरणांमधून 25 कोटी 1 लाख रुपयांची कमाई झाली. भुसावळ विभागाने 1 लाख 93 हजार प्रकरणात 17 कोटी 7 लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर नागपूर विभागाने 1 लाख 19 हजार प्रकरणात 7 कोटी 56 लाख रुपये दंड वसूल केला. सोलापूर विभागाने 54 हजार सातशे प्रकरणात 3 कोटी 10 लाख रुपये आणि पुणे विभागाने 83.81 हजार प्रकरणात 6 कोटी 56 लाख रुपये दंड वसूल केला आहे. एकंदरीत कोट्यवधींचा दंड विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनन वसूल करण्यात आला आहे.






