मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा गावदेवी येथील स्थानिक रहिवासी असलेले अफजल शेख, हसन शेख, मोइनुद्दीन शेख हे तीन तरुण स्कुटीवरून मुब्रा बायपास रोडवरून प्रवास करत होते. या प्रवासा दरम्याना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट बाजूनेच भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर खाली चिरडले गेल्याची घटना घडली आहे.
खरं तर रस्त्यावर पडताच ट्रकच्या मागच्या चाकात अडकून या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे तीन ही तरूण सुमारे 20 ते 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणझे हे तीनही तरूण एकाच कुटुंबातील असल्याची ती देखील माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
advertisement
मुब्रा बायपासवर गावदेवी जवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. या घटनेनंतर सतंप्त जमाव घटनास्थळी जमला आहे. तसेच घटनास्थळी पोलीसही दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. आणि तरूणाच्या मृत्यूनंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पुढील कायदेशीर कारवाई साठी पोलीस तपास करत सुरू केला आहे.
एका डंपर चालकाने 3 जणांना चिरडलं
मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर भागात एका डंपर चालकाने 3 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या भीषण अपघातात तिन्ही प्रवशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गोवंडी शिवाजीनगर सिग्नल येथे ही सर्व घटना घडली असून तणावाचे वातावरण सध्या या ठिकाणी निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून संतप्त नागरिकांनी पोलिसांनाच आता घेरावा घातला आहे. यात एक गंभीर असून त्याच्यावर सध्या जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंकरोडवर शिवाजीनगर भागात हा अपघात घडला आहे. अपघात झाल्यानंतर संतप्त नागरिकांना डंपरच्या काचा फोडल्या आणि तोडफोड केली. त्यामुळे दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आणि मोठी वाहतूक कोंडी झाली.