महाराष्ट्र टाईम्सने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. जोगेश्वरीमधील वेरावली भागात पंचतारांकीत हॉटेलचे बांधकाम करण्यासाठी विशिष्ट माहिती दडवून व दिशाभूल करून मुंबई महापालिकेची परवानगी मिळवल्याचा वायकरांवर आरोप होता. पण आता या प्रकरणात पुरावे नसल्याचे म्हणत मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगाव न्यायालयायाचे न्यायदंडाधिकारी एस.आर. निमसे यांनी नुकताच स्विकारला आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर, मनिषा वायकर तसेच त्यांच्या भागिदारांविरोधात दाखल झालेले फौजदारी प्रकरण आता बंद झाले आहे.
advertisement
विशेष म्हणजे रवींद्र वायकर हे ठाकरे गटात असताना याच प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात आरोपाचे रान उठवलं होतं. रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रिंडागण आणि गार्डनसाठी असलेल्या जागेचा कब्जा करून हॉटेल बांधायला सुरूवात केल्याचा आरोप केला होता. या हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा दावाही वायकर यांनी केला होता.
तसेच गार्डनच्या जागेवर वायकर यांनी सुप्रीमो कंपनीद्वारे आधी सुप्रीमो बॅक्वेट बांधल. या बागेची रेडी रेकरनुसार 4 कोटी किंमत होती. मात्र वायकर यांनी हा भूखंड तीन लाख रूपयात खरेदी केला आहे. आणि त्या जागेवर आता लग्न, पार्टी आणि अनधिकृत व्यवहार सूरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान सोमय्या यांच्या या आरोपानंतर रविंद्र वायकर तुरूंगाच जातील, असे बोलले जात होते.मात्र आता या प्रकरणात पुरावे नसल्याचे म्हणत मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगाव न्यायालयायाचे न्यायदंडाधिकारी एस.आर. निमसे यांनी नुकताच स्विकारला आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर, मनिषा वायकर तसेच त्यांच्या भागिदारांविरोधात दाखल झालेले फौजदारी प्रकरण आता बंद झाले आहे.
