घाटकोपरमधील वसंत विहार इमारतीमधील एका रूमला आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट असून घटनास्थळी धुराचे मोठे लोट आहेत. आगीची घटना समजताच घटनास्थळी अग्निशामन दल आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत.
advertisement
तसेच इमारतीमधील रहिवाशांना इमारतीमधून खाली काढण्याचे काम सुरू आहे. पुढच्या काही मिनिटांतच नागरिकांचे बचावकार्य पूर्ण होईल, असे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात आले.
कांदिवलीतल्या इमारतीलाही आग
कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेजमधील इमारतीला आग लागल्याची माहिती आहे. इमारतीच्या 23व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कराण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. L1 लेव्हलची आग असल्याचे कळते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 8:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत घाटकोपरमधील बिल्डिंगला आग, धुराचे लोट, नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू
