म्हाडाच्या मुंबईतील लॉटरीविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, म्हाडाकडून दिवाळीत 5000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र, या लॉटरीसाठी अद्याप कोणतीही तयारी झालेली नाही. त्यामुळे यंदा लॉटरी निघणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. तसेच विक्रीसाठी घरं देखील उपलब्ध नसल्याने लॉटरीला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
NMMS Scholarship: विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज?
advertisement
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2026 च्या सुरुवातीला लॉटरी काढली जाईल, अशी शक्यता आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात ही लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून दरवर्षी हजारो घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाते. मुंबईकर याला मोठा प्रतिसाद देत असतात. 2006 ते 2019 या काळात कधीही मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये खंड पडला नव्हता. पण, 2020 ते 2022 या दरम्यान कोरोनामुळे लॉटरी काढता आली नव्हती. त्यानंतर 2023 आणि 2024 मध्येही लॉटरी निघाली होती. यावर्षी पुन्हा लॉटरीत खंड पडला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या मुंबईकरांची निराशा झाली आहे.