समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येवर विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
समृद्धी महामार्गावर अपघात आणि मृत्यू वाढले असून २०२३ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान ४२५ अपघातात ४०५ मृत्यू झाले. सरकारने विविध उपाययोजना आणि सुविधा सुरू केल्या आहेत.
समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या आणि मृत्यू यामध्ये २६ टक्के वाढ झाल्याच्या मुद्द्यावर लक्षवेधताना अपघातांची संख्या सन २०२४ मधील ६८ वरून सन २०२५ मध्ये ९४ वर गेली असून या वर्षात आज पर्यंत १०७ मृत्यू झाला असल्याची माहिती दिली
यावर उत्तर देताना या महामार्गावर सन-२०२३ ते माहे ऑक्टोंबर, २०२५ यादरम्यान झालेल्या ४२५ अपघातांपैकी २८८ अपघात प्राणांतीक स्वरुपाचे असून त्यामध्ये एकूण ४०५ व्यक्तींचा दुर्देवी मृत्यु झाल्याचं मुख्यमंत्री यांनी लेखी उत्तरात माहिती दिली
advertisement
सरकारने लेखी उत्तरात अपघाताची दिलेली कारणे खालील प्रमाणे
- विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे,
- वाहन चालकास झोप लागणे (Road) Hypnosis),
- वाहनांचे टायर फुटणे,
- वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे,
- चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकिंग करणे,
advertisement
- लेन शिस्त न पाळणे,
- सुस्थितीत वाहने नसणे,
- वाहन अवैधरित्या पार्क करणे,
- तसेच ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हर सतर्क नसणे,
- वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड असणे,
- व्यसन करून वाहन चालविणे,
- मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे,
advertisement
- वाहतूक नियमाचे पालन न करणे, इत्यादी कारणांमुळे झालेले आहेत.
दरम्यान या सगळ्यामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजन देतानाच आगामी काळात
तसेच समृध्दी महामार्गावरील नियोजीत एकूण २९ महामार्ग सोयी-सुविधांपैकी सद्यःस्थितीत २२ ठिकाणी इंधन स्थानके व स्नॅक्स सेंटर स्वच्छतागृहांसह कार्यरत आहेत. याव्यतिरीक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एकूण २१ ठिकाणी प्रत्येकी २० असे मिळून एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली आहे. त्यांची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आलेला असून त्यांच्याकडून नियमितपणे एफआरपी स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवण्यात येत आहे. तसेच ७ ठिकाणी तात्पुरत्या हॉटेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उर्वरित ठिकाणी महामार्ग सोयी-सुविधा विकसित करण्याचे काम जलदगतीने करण्याबाबत संबंधीत सवलतदारास वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत . असे सरकारने म्हटलं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येवर विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली









