TRENDING:

Mumbai News : सोसायटीच्या आवारात खेळताना कारने चिरडलं, 7 वर्षाचा मुलगा वेदनेने किंचाळला...अपघाताचा LIVE VIDEO

Last Updated:

मुंबईतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोसायटीच्या आवारात खेळत असताना एका मुलाला कारने चिरडल्याची घटना घडली आहे.या घटनेत मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

Mumbai News : विजय वंजारा,मुंबई : मुंबईतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोसायटीच्या आवारात खेळत असताना एका मुलाला कारने चिरडल्याची घटना घडली आहे.या घटनेत मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. अन्वय असे या 7 वर्षीय जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मालाड पश्चिमेतील इंटरफेस हाइट्स या इमारतीत ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.या व्हिडिओत मुलगा वेदनेने व्हिवळत आणि किंचाळताना दिसतोय.त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय.

advertisement

मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलच्या मागे इंटरफेस हाइट्स या इमारतीत ही घटना घडली आहे. 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळी अन्वय सोसायटीच्या आवारात खेळत होता. या दरम्यान सोसायटीत येणाऱ्या एका चारचाकीने त्याला चिरडलं होतं. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत अन्वय खेळत असताना त्याच्या पायावरून कार जाते. या घटनेनंतर अन्वय वेदनेने व्हिवळतो,तसेच तो किंचाळताना दिसत आहे.त्यानंतर कार चालक महिला गाडीतून बाहेर पडल्यानंतर तिला हा सगळा प्रकार कळतो.

advertisement

ही घटना 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर बांगूर नगर पोलिसांनी 20 ऑक्टोबर रोजी श्वेता शेट्टी-राठोड या महिला कारचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अन्वयची आई महुआ मजुमदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, महुआ मुजुमदार यांना सात वर्षांची दोन जुळी मुले आहेत, अन्वय आणि अव्यन अशी त्यांची नावे आहेत. 19 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता त्यांची दोन्ही मुले चार ते पाच मुलांसह सोसायटीच्या आवारात खेळत होती. या दरम्यान श्वेता शेट्टी यांनी त्यांच्या कारने अन्वयला चिरडलं, ज्यामध्ये अन्वयचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता.

advertisement

या घटनेनंतर अव्यन याने इंटरकॉमद्वारे आईला फोन करून या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर महुआ आणि तिचा पती अंशुमन घटनास्थळी धावले आणि त्यांना त्यांचा मुलगा दुखापतग्रस्त अवस्थेत जमिनीवर बसलेला आढळला. त्यानंतर अन्वयला प्रथम मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगर येथील एका नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पालकांना त्याला अंधेरी पश्चिमेतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्याचा सल्ला दिला. कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी पुष्टी केली की अन्वयच्या डाव्या घोट्याला आणि नडगीला फ्रॅक्चर झाले आहे आणि शस्त्रक्रिया आवश्यक आहे. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे.

advertisement

या घटनेनंतर महुआ मजुमदार यांच्या तक्रारीवर आधारित, बांगूर नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम २८१ (अविचारीपणे गाडी चालवणे किंवा सार्वजनिक रस्त्यावरून सायकल चालवणे) आणि कलम १२५(ब) (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (धोकादायकपणे गाडी चालवणे), १३४(अ) (वैद्यकीय मदत न देणे) आणि १३४(ब) (२४ तासांच्या आत अपघाताची तक्रार न करणे) अंतर्गत श्वेता शेट्टी-राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला. श्वेता शेट्टी-राठोड या इमारत सचिव संजय राठोड यांच्या पत्नी आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
450 झाडांची केली लागवड, सीताफळ शेतीतून लाखात कमाई, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai News : सोसायटीच्या आवारात खेळताना कारने चिरडलं, 7 वर्षाचा मुलगा वेदनेने किंचाळला...अपघाताचा LIVE VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल