TRENDING:

राणीच्या बागेतील 'शक्ति'चा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसांनी उघड झाली माहिती, प्राणीप्रेमी संतप्त

Last Updated:

Mysterious Death Shakti Tiger Byculla Zo :भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती या वाघाचा संशयास्पद मृत्यू समोर आला आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली असून, प्राणीसंग्रहालय प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाला दररोज पर्यटक भेटी देत असतात. विशेषता चिमुकल्यांना हे ठिकाण जास्त आवडते. मात्र आता या प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जी या प्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे.
News18
News18
advertisement

राणी बागेत वाघाचा रहस्यमय मृत्यू

भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात शक्ती वाघ 2020मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलेला होता. तो वेळी हा वाघ साडेतीन वर्षांचा होता आणि आता तो दहा वर्षांचा होता. या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला असल्याची माहिती मिळत असली तरी वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस लपवली असल्याने उद्यान व्यवस्थापनाकडून योग्य ती देखभाल झाली नसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

advertisement

दहा वर्षांचा असलेल्या या वाघाची आता पूर्ण वाढ झालेली होती. या उद्यानात प्रशासनाने नैसर्गिक अधिवास केला होता ज्यात तो राहत होता. शिवाय या वाघाला खाण्यासाठी मांसाहारही देण्यात येत होते शिवाय मुबलक पाणी, बसण्यासाठी-विहार करण्यासाठी ठिक-ठिक ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोहत दुसरा वाघ जय आणि वाघीण करिश्माही होते. परंतू 17 नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

advertisement

8 दिवसं गप्प का बसलं राणी बाग प्रशासन?

भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी हे दावा केला आहे की,‘शक्ती’ वाघाचा मृत्यू मांस खाताना हाड श्वसननलिकेत अडकल्यामुळे झालेला आहे. एवढचं नाही तर ज्या वेळेस वाघाचा मृत्यू झाला त्याची माहिती ही कायद्यानुसार महाराष्ट्र झू अथोरिटी आणि सेंट्रल झू अथोरिटीला सविस्तर माहिती देणे आवश्यक होती. मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

एवंढचं म्हणजे मृत्यू जाहीर करण्याआधी वाघाची विल्हेवाट कशी लावली आणि पोस्टमॉर्टम 24 तास देखरेखीखाली केले का, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शक्तीचा मृत्यू 17 नोव्हेंबरला झाला पण माहिती मात्र आठ दिवसांनी दिली. त्यामुळे आमदार अजय चौधरी यांनी चौकशीची मागणी केली आहे. नमुने नागपुरला पाठवले असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राणीच्या बागेतील 'शक्ति'चा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसांनी उघड झाली माहिती, प्राणीप्रेमी संतप्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल